श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेशी संबंधित एस टेबल टेनिस क्लबच्या दिव्यांशी भौमिकने इंदूर येथे झालेल्या मध्य विभागीय नॅशनल रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलींच्या गटात पहिले राष्ट्रीय विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात दिव्यांशीने भारतीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सिंड्रेला दासचा ४-२ (११-१३, ५-११, ११-४, ११-४, ११-९,११-८)असा पराभव केला.
दिव्यांशीने उपांत्य फेरीत नंदिनी बालाजी (भारतीय क्रमवारी ३) हिचा ४-० (११-९, ११-४, ११-७, ११-५) असा सहज पराभव केला. दिव्यांशीने उपउपांत्यपूर्व फेरीत काव्या भट्ट (भारतीय क्रमवारी ७), उपांत्यपूर्व फेरीत अविशा करमरकर (भारतीय क्रमवारी ४) यांचा सहज पराभव केला. या स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते अंतिम फेरीपर्यंत तिला अंशुमन रॉय आणि तिचे राष्ट्रीय शिक्षक आकाश कासार यांचे मार्गदर्शन मिळाले.