ठाणे

बोईसरमध्ये धान्याचा काळाबाजार उघडकीस

बोईसर वंजारवाडा रेशन दुकानाच्या जवळ संशयास्पद रीतीने उभे असल्याचे समजताच याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना तातडीने खबर दिली

प्रतिनिधी

ऐन सणासुदीच्या दिवसात सामान्य नागरीकांना वाटप करण्यासाठी ठेवलेला बोईसर वंजारवाडा येथील रास्त भाव धान्य दुकानातील १० टन तांदूळ चोरीछूपे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याचा डाव काही जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडला आहे.

सकाळी चार वाजेच्या सुमारास बोईसर येथील एका रास्त भाव धान्य दुकानाबाहेर दोन टेम्पो बोईसर वंजारवाडा रेशन दुकानाच्या जवळ संशयास्पद रीतीने उभे असल्याचे समजताच याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना तातडीने खबर दिली. स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते येत असल्याची चाहूल लागल्यावर एक टेम्पो चालक टेम्पो घेऊन पळून गेला. तर दूसरा टेम्पो तांदळाच्या साठ्यासह पकडण्यात यश

रेशनिंगच्या तांदूळ वाहतूक करणारा एक टेम्पो पळून गेल्याने टेम्पो पकडण्यासाठी पोलिसांनी चिल्हार बोईसर रस्त्यावरील बेटेगाव चौकीवर नाकाबंदी लावली होती. सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास वाहने तपासणी सुरू असताना तांदूळ वाहतूक करणारा दुसरा टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे.

तांदूळ भरलेली दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली असून पालघर पुरवठा विभागाकडून जप्त केलेल्या धान्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

धान्य भरलेले दोन्ही टेम्पो बोईसर पोलिस स्टेशन येथे नेण्यात येऊन पुरवठा निरीक्षक देवेंद्र पाटील यांच्या समक्ष धान्याचा पंचनामा करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही वाहनामध्ये प्रत्येकी ५० किलो वजनाच्या २०० गोणी असा एकूण १० टन रेशनिंगचा तांदूळ आढळून आला असून गोणींवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा शिक्का आढळून आला आहे.

याप्रकरणी आरोपींवर अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक देवेंद्र पाटील यांनी दिली. याप्रकरणी आणखी कोण कोण सामील आहे याचा तपास बोईसर पोलिस करीत आहेत.

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून यलो-ऑरेंज अलर्ट

CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video

आता वेटिंगचं नो टेन्शन! IRCTC च्या AI फीचर्समुळे रेल्वे तिकीट होणार मिनिटांत बुक; जाणून घ्या सीक्रेट ट्रिक

डेंग्यूची भीती आता कमी होणार? भारतात पहिली QDENGA लस; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

'मी मॅन-हेटर आहे'; 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील वक्तव्यानंतर शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई? जाणून घ्या नेमकं प्रकरण