ठाणे

वीटभट्टी व्यावसायिकांमध्ये अवकाळी पावसाची भीती; कच्चा माल वाचवण्यासाठी मालकांची लगबग

वीटभट्टी व्यवसायाला सुगीचे दिवस आलेले असतानाच अवकाळी पावसाच्या भीतीने वीटभट्टी व्यावसायिकांमध्ये आर्थिक नुकसानीचे काळे ढग निर्माण झाले आहेत.

Swapnil S

भिवंडी : वीटभट्टी व्यवसायाला सुगीचे दिवस आलेले असतानाच अवकाळी पावसाच्या भीतीने वीटभट्टी व्यावसायिकांमध्ये आर्थिक नुकसानीचे काळे ढग निर्माण झाले आहेत, तर दुसरीकडे कच्चा माल पाण्यात भिजून नुकसान होऊ नये, याकरिता मालकांनी कच्च्या तयार विटांच्या मालावर ताडपत्री टाकून वीटभट्टीला संरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचे भिवंडी तालुक्यात सुरू असलेल्या अनेक ठिकाणच्या वीटभट्टी व्यवसायावरून दिसून आले. त्यातच हवामान विभागाने दिलेल्या निर्देशानुसार मंगळवारी आणि बुधवारी ठाणे,पालघर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुषंगाने भिवंडी तालुक्यातील वीटभट्टी मालकांसह ठाणे, पालघरमधील वीटभट्टी व्यावसायिकांमध्येही नुकसान होण्याची भीती पहावयास मिळत आहे.

अशाच प्रकारे मागील वर्षी अचानकपणे बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान मंगळवारी सकाळी अचानपणे पावसाच्या सरी सुरू झाल्याने हवामान विभागाकडूनही तसा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या भीतीने वीटभट्टी मालक चांगलेच धास्तावले असून कच्च्या मालाच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यंदा १ हजारी विटेला साडेपाच रुपये इतका भाव मिळत आहे. त्यामुळे वीटभट्टी मालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. परंतु मंगळवारी बरसलेल्या अवकाळी पावसाच्या सरींनी वीटभट्टी व्यावसायिकांची चिंता वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई