गरोदर महिला आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी मासे फायदेशीर ठरू शकते. PM
ठाणे

'किलकारी' घेणाऱ्या गरोदर महिलांची काळजी ; २८ लाख मातांना योजनेचा लाभ

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात जानेवारी महिन्यातील आकडेवारी पाहता २६ हजार ३३३ गर्भवती महिलांची नोंद आहे.

Swapnil S

ठाणे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे गरोदर महिलांच्या व एक वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुरक्षेसाठी 'किलकारी' ही नवीन योजना आणि आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमी राज्यात सुरू करण्यात येणार आहे. महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासावर केंद्र व राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणावर भर आहे. गर्भवती व प्रसूत महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. किलकारी योजना देशातील १८ राज्यांमध्ये सुरू आहे. महाराष्ट्रातील सुमारे २८ लाख नोंदणीकृत गरोदर मातांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत देखील 'किलकारी' या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात जानेवारी महिन्यातील आकडेवारी पाहता २६ हजार ३३३ गर्भवती महिलांची नोंद आहे. दर महिन्याला हजारपेक्षा जास्त गर्भवतींची नोंद होते. आशा सेविकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी मोबाईल अकादमी देखील सुरू करण्यात येणार आहे तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यास व परीक्षा पास झाल्यास आशा सेविकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या माध्यमातून गरोदर मातांना एक प्रकारे आधार मिळणार आहे. त्याचबरोबर हा उपक्रम राज्यभर सुरू करणार आहेत.

याद्वारे ठाणे जिल्ह्यातील ११२३ आशा सेविकांना त्यांच्या कामात उपयुक्त ठरणारे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. आशा सेविका यांच्यासाठी नोंदणीकृत १४४२९ दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच किलकारी सेवा देण्यासाठी येणारा दूरध्वनी क्रमांक ०१२४-४४५१६६० असेल.

मोबाईल आरोग्यसेवा

योजनेंतर्गत गर्भवती महिलेला गावातील आरोग्यसेविकाद्वारे आर.सी.एच. पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद (आयव्हीआर) आधारित मोबाईल आरोग्यसेवा आहे. गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपनविषयक ७२ श्राव्य संदेश थेट कुटुंबांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून मूल एक वर्षांचे होईपर्यंत आई व बाळाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोफत, साप्ताहिक रेकॉर्डेड ऑडिओ कॉल करण्यात येतील. ऑडियो कॉल चुकल्यास किंवा त्या आठवड्यातील ऑडिओ कॉल पुन्हा ऐकायचा असल्यास नोंदणीकृत १४४२३ या मोबाईल क्रमांकाद्वारे संपर्क करता येणार आहे.

'किलकारी' ही योजना गरोदर माता व बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. वेळीच काय व कशाप्रकारे काळजी घ्यावी, याबाबत माता जागरूक बनवेल.

-डॉ. रूपाली सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी