ठाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी जनगौरव सोहळा १३ ऑगस्टला संपन्न होणार

सरकारची मोठी जबाबदरी असल्याने मुख्यमंत्रांच्या नागरी सत्कार सोहळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची चर्चा आहे

वृत्तसंस्था

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमधील सेवाभावी संस्थांनी एकत्र येत योजलेला त्यांचा नागरी जनगौरव सोहळा आता ३० जुलैऐवजी १३ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न होणार आहे. सोमवारी, २५ जुलै रोजी ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल येथे झालेल्या मुख्यमंत्री जनगौरव समितीच्या बैठकीत जनगौरव सोहळ्याच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यवेळापत्रकातील अपरिहार्य बदलामुळे जनगौरव सोहळ्याच्या नियोजित तारखेत बदल करण्यात आला असल्याचे सांगितले आहे, मात्र एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झाला नाही, त्यामुळे शिंदे यांच्यावर राज्य सरकारची मोठी जबाबदरी असल्याने मुख्यमंत्रांच्या नागरी सत्कार सोहळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची चर्चा आहे. या आयोजन समितीत ठाण्यातील कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी क्षेत्रांतील संस्थांचा समावेश आहे.

शिंदे यांना सोहळ्यास उपस्थित राहणे शक्य नसल्यामुळे आता हा जनगौरव सोहळा शनिवार, १३ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न होणार आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

शेती बुडाली, डोळ्यात अश्रू! मराठवाड्यात पावसामुळे हाहाकार; ८ जणांचा मृत्यू; शुक्रवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार

जनतेच्या पैशाचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही; सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला फटकारले

अकरावीच्या रिक्त जागांमध्ये दडलेय काय?

माझी मुंबई वाहतूक कोंडीत कावली!