ठाणे

MMR मधील शहरे महामार्गाशी जोडणार; NH-3 व्हाया कल्याण-बदलापूर ॲक्सेस कंट्रोलची उभारणी, १५ मिनिटांतच शहराबाहेर जाता येणार!

Swapnil S

शंकर जाधव/डोंबिवली

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी 'नवी मुंबई एनएच- ३ व्हाया कल्याण-बदलापूर ॲक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर एमएमआर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली जाणार असून शहरांतर्गत वाहतुकीतून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने या मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीबाबत एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत या मार्गाच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून हा मार्ग गतीने उभारण्याबाबत उपाययोजना राबविण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कल्याणमधील वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यातील अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असल्यामुळे वाहतुकीचा चेहरामोहरा यामुळे पालटणार आहे. याच पार्श्वभूमीवर एमएमआर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी जोडण्यासाठी नवी मुंबई एनएच - ३ व्हाया कल्याण-बदलापूर ॲक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या उभारणीबाबत नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली.

असा असणार ॲक्सेस कंट्रोल मार्ग

-मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग येथून या रस्त्याची सुरुवात

-पालेगाव येथे पहिला इंटरचेंज याद्वारे अंबरनाथ शहरात तसेच काटई-बदलापूर मार्गावर जाता येणार आहे.

-कल्याण पूर्वेतील हेदुटणे येथे दुसरा इंटरचेंज असून मेट्रो -१२ च्या हेदुटणे स्थानकात जाता येणार तसेच कल्याण रिंग रोडची कनेक्टिव्हीटी असणार आहे.

-कल्याण - शिळफाटा मार्गावर देखील येथून जाता येणार आहे.

-शिरढोणवरून मल्टी मोड कॉरिडोअर मार्गाला जाता येणार.

-या मल्टिमोड कॉरिडोरमुळे थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसशी जुळता येणार

-हाच मल्टिमोड कॉरिडोर सीटीएस कोस्टल रोडमार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठता येणार.

-शिरढोण येथील तिसऱ्या इंटरचेंजमुळे कल्याण येथील २७ गावे जोडली जाणार

-मुंबई - पनवेल हायवेला देखील या मार्गाला जोडला जाणार

-खारघर-तुर्भे लिंक रोडला थेट जोडण्यात येणार आहे. या लिंक रोडची प्रत्यक्ष उभारणीचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे. या लिंक रोडद्वारे थेट नवी मुंबई शहरात जाता येणार आहे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाता येणार आहे.

-संपूर्ण मार्ग ॲक्सेस कंट्रोल असून ग्रीन फिल्ड मार्ग असणार आहे.

-समृद्धी महामार्गाद्वारे मुंबई - आग्रा हायवेवर जाता येणार

-या मार्गामुळे शहराच्या बाहेरून वाहनांचा प्रवास होणार

-बदलापूर ते डोंबिवलीकरांना थेट मुंबई आणि नवी मुंबई गाठता येईल.

तुर्भे-तळोजा-उसाटने, खारघर-तुर्भे लिंक रोडचा चांगला पर्याय

यावेळी 'टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर' कंपनीने सुचविलेल्या अनेक पर्यायांवर यावेळी त्यांच्या तज्ज्ञांशी खासदार डॉ. शिंदे यांनी संवाद साधला. तर टाटामार्फत यावेळी बदलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (तुर्भे-तळोजा-उसाटने आणि खारघर-तुर्भे लिंक रोड) हा रुट ॲक्सेस कंट्रोल मार्गासाठी चांगला पर्याय असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले असून हा मार्ग गतीने उभारण्याबाबत उपाययोजना राबविण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन