ठाणे

कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना बेघर होऊ देणार नाही; रेल्वे प्रबंधकांना जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील २२ इमारतींना रेल्वे प्रशासनामार्फत नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत

प्रतिनिधी

मुंब्रा येथील इमारतींना रेल्वेने नोटीस बजावून त्या रिकाम्या करण्याचे सूचित केले आहे. मात्र, मुंब्राच काय, कल्याण, मुंबईतील एकाही नागरिकांना बेघर होऊ देणार नाही. यापुढे नोटीसच काय, सदर इमारतींच्या जवळपासही फिरकू देणार नाही; ज्या नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेऊन आपल्या घरांवर तिरंगा फडकवला त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बेघर होऊ देणार नाही, असा इशारा माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक सलभकुमार गोयल यांची भेट घेऊन दिला.

मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील २२ इमारतींना रेल्वे प्रशासनामार्फत नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत. या इमारतींना अचानक नोटीसा बजावण्यात आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था व भीतीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेच्या मुख्यालयात जाऊन रेल्वे प्रबंधक सलभकुमार गोयल यांची भेट घेतली. या भेटीमध्ये रेल्वे प्रबंधकांनी आणखी नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली.

"ज्यांना स्वतःच्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते..."; मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Mumbai : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याने शिवाजी पार्क परिसरात तणाव; ठाकरे गट संतप्त, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

Mumbai : २० सप्टेंबरपासून मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद; MMRDA चा निर्णय

जपानमधून ‘टायफून’ क्षेपणास्त्र हटवा! चीनची अमेरिकेकडे मागणी

राज्यातील सर्व न्यायालये कार्यरत आहेत का? खासदार, आमदारांविरोधातील खटल्यांबाबत हायकोर्टाने सरकारला फटकारले