ठाणे

कांदळवन क्षेत्रात बेकादेशीर पाइपलाईन करणाऱ्या कंपनीवर गुन्हा

तक्रारीनुसार तालुका स्तरीय कांदळवन उपसमितीकडून ३० नोव्हेंबर २०२३ रोजी स्थळ पाहणी करण्यात आली होती.

Swapnil S

भाईंंदर : भाईंदर पश्चिमेच्या राधास्वामी सत्संग वॉकिंग रोड लगत कांदळवन क्षेत्रात बेकादेशीररित्या पर्यावरण विभागाची परवानगी न घेता शहरातील सूर्या पाणी पुरवठा अंथरने व्यवस्थेच्या कंत्राटदार मे. इगल इन्फ्रा इंडिया कंपनी यांनी पर्यावरण विभागाची परवानगी न घेता कांदळवन क्षेत्रात खोदकाम पाइपलाईन टाकल्याप्रकरणी अप्पर तहसीलदार यांच्या आदेशानुसार तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गुप्ता व फॉर फ्युचर इंडियाचे अध्यक्ष हर्षद ढगे यांनी अप्पर तहसीलदार, मीरा भाईदर यांच्याकडे २८ ऑक्टोबर २०२३ रोजी कांदळवन क्षेत्रात बेकायदेशीर खोदकाम करून पाइपलाईन टाकल्याबाबत तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर लगेच कारवाई म्हणुन कांदळवन व इतर झाडांवर मातीचा भराव करत असलेल्या तर कांदळवन झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी जेसीबी जप्तीची कारवाई करण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार तालुका स्तरीय कांदळवन उपसमितीकडून ३० नोव्हेंबर २०२३ रोजी स्थळ पाहणी करण्यात आली होती.

त्याबाबातचा अहवाल वन परिक्षेत्र अधिकारी, ठाणे (कांदळवन) मुंबई, कांदळवन संधारक घटक यांनी अप्पर तहसीलदार मीरा-भाईदर यांना वस्तुस्थिती कळविण्यात आली होती. तसेच त्या ठिकाणी खोदकाम हे कंत्राटदार मे. इगल इन्फ्रा इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीने केल्या बाबतचे पत्र पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांनी तसा अहवाल दिला होता. त्या अनुषंगाने अप्पर तहसीलदार मीरा-भाईंदर यांनी मे. इगल इन्फ्रा इंडिया कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी