KDMC Water Cut : डोंबिवली पूर्वेत मंगळवारी १६ तास पाणीपुरवठा बंद 
ठाणे

KDMC Water Cut : डोंबिवली पूर्वेत मंगळवारी १६ तास पाणीपुरवठा बंद

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून डोंबिवली पूर्व विभागातील पाणीपुरवठा मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी १६ तास बंद ठेवण्यात येणार आहे.

Swapnil S

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून डोंबिवली पूर्व विभागातील पाणीपुरवठा मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी १६ तास बंद ठेवण्यात येणार आहे. नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवली पूर्व विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या १५० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवली पूर्व विभागाला पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रातून येणाऱ्या ११०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला परिवहन डेपोच्या बाजूला गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यासाठी मंगळवारी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या कालावधीत नेतिवली केंद्रातून डोंबिवली पूर्व विभागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक तेवढाच साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : तयार फराळाला महागाईची फोडणी; दरांमध्ये झाली ३० ते ४० टक्क्यांनी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री

इंडिया आघाडीचा ‘सार्वजनिक महाभियोग’ कार्यक्रम आज

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : जखमी चालक, ब्लॉगरला रुग्णालयातून डिस्चार्ज

FDA तील चार अधिकारी निलंबित; कारवाई करताना अनियमितता, २१ जणांविरुद्ध विभागीय चौकशी

६ राज्यांत SIR च्या मुदतीत वाढ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय