डोंबिवली एमआयडीसीच्या पाण्यात सापडल्या अळ्या; स्थानिक नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर; रहिवाशी संतप्त  
ठाणे

डोंबिवली एमआयडीसीच्या पाण्यात सापडल्या अळ्या; स्थानिक नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर; रहिवाशी संतप्त

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात घरातील नळातून आलेल्या पाण्यात अळ्या आढळल्याने स्थानिक नागरिक संतापले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात घरातील नळातून आलेल्या पाण्यात अळ्या आढळल्याने स्थानिक नागरिक संतापले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या दोन दिवसांपासून मिलापनगर आणि इतर निवासी भागात एमआयडीसीच्या पाइपलाइनमधून थेट घरात येणाऱ्या पाण्यात लालसर अळ्या दिसून येत आहेत.

मिलापनगरमधील बंगलो प्लॉट क्रमांक ‘आरएल-१३६’ मध्ये आणि आजूबाजूच्या बंगल्यात पण या लालसर अळ्या नळातून येत असल्याचे दिसत आहेत. या बंगल्यात राहणाऱ्या अश्विनी देशपांडे- कुलकर्णी यांना गेल्या दोन दिवसांपासून या लालसर अळ्या येत असल्याचे दिसत असल्याने त्यांनी मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव अरुण जोशी आणि कार्यकारिणी सदस्य राजू नलावडे यांना संपर्क करून हा प्रकार प्रत्यक्ष दाखविला. २४ तारखेला एमआयडीसी कार्यालयाला गुरू नानक जयंती निमित्ताने सुट्टी असल्याने त्यांच्या अधिकाऱ्यांना मेसेजद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

एक महिन्यापूर्वी एमआयडीसीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले होते. त्याची तक्रार एमआयडीसीकडे केल्यावर त्यांनी त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. परंतु त्याच्या तपासणी अहवाल अद्याप सार्वजनिक जाहीर केला नाही किंवा रहिवाशी नागरिकांना त्याची माहिती दिली गेली नाही आहे.

एमआयडीसीकडून पाणी टंचाईमुळे पाणी कपात चालू असून सर्व नागरिक त्यामुळे पाणी जपून वापरीत आहेत. त्यातच अळ्या आणि पाण्याला दुर्गंधी असे प्रकार होत आहे, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे म्हणाले.

या पाण्यामुळे कॉलरा, टायफॉईड, अतिसार, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश आणि हेपिटायटिस-ए आणि ई आदी जलजन्य आजारांचा धोका संभवतो. अळ्या डासांच्या असल्यास डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियाचाही अप्रत्यक्ष धोका निर्माण होऊ शकतो. तातडीने पाण्याचे नमुने तपासणे, जलवाहिन्या व साठवण टाक्यांचे ऑडिट करणे आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. दूषित पाणी हे आजारांचे आमंत्रण आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : टँकरवर आता 'आयओटी'ची नजर; पाणी वितरणाची दर १५ मिनिटांनी अपडेट मिळणार, ३१ टँकर भरणा केंद्रांवर फ्लो मीटर

नव्या शहाड उड्डाणपुलासाठी हालचालींना वेग; महापौरांनी घेतला प्रकल्पाचा आढावा

Navi Mumbai : फिनो पेमेंट्स बँकेच्या खात्यांतून १.५६ कोटींची लूट

रब्बी हंगामही दुष्काळाच्या फेऱ्यात; फक्त २७ टक्क्यांवर पेरण्या पूर्ण

यूपी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला २६ जागा देण्यास सपा तयार