Dombivli : २४ तासांऐवजी ३६ तास पाणीपुरवठा बंद; रहिवासी वैतागले; कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू संग्रहित छायाचित्र
ठाणे

Dombivli : २४ तासांऐवजी ३६ तास पाणीपुरवठा बंद; रहिवासी वैतागले; कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू

डोंबिवली एमआयडीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा कपातीच्या वेळापत्रकानुसार २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. गुरुवार, १९ नोव्हेंबरपासून शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार होता...

Swapnil S

डोंबिवली : एमआयडीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा कपातीच्या वेळापत्रकानुसार २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. गुरुवार, १९ नोव्हेंबरपासून शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. मात्र, प्रत्यक्षात शनिवारी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठा सुरू झाला. त्यातही पाणी कमी दाबाने येत असल्याने रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीकडून घोषित वेळेपेक्षा अतिरिक्त १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

यापूर्वी एमआयडीसीकडून जाहीर सूचनेनुसार ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत होता. मात्र, नागरिकांच्या मागणीनंतर आठवड्यातून एकदा होणारी पाणीपुरवठा कपात ३६ तासांऐवजी २४ तास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असे असतानाही प्रत्यक्षात ३६ तासांनंतरच पाणीपुरवठा सुरू होत असल्याने एमआयडीसीकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याची भावना रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

पाइपलाइन फुटल्याचा गैरसमज

एमआयडीसीने शटडाऊन घेतलेल्या कालावधीत कल्याण-शीळ रस्त्यावरील काटई नाक्याजवळ पाण्याच्या पाइपलाइनमधील पाणी बाहेर काढण्याची (डीवॉटरिंग) प्रक्रिया करण्यात आली. यावेळी पाइपलाइनमध्ये साचलेले पाणी आणि गाळ बाहेर काढण्यात आला. या प्रक्रियेदरम्यान काढण्यात आलेल्या छायाचित्रांमुळे पाइपलाइन फुटल्याचा काही नागरिकांचा गैरसमज झाला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : शासकीय कर्मचाऱ्यांना घरदिलासा; वांद्रे, पवई, घाटकोपरला ५०० नवी सेवा निवासस्थाने

भारताच्या GDP वाढीची प्रशंसा; डोनाल्ड ट्रम्प यांची फेडरल रिझर्व्हवर टीका

Mumbai : १० महिन्यांत ७ खून, उपनगरीय लोकलमध्ये हत्यासत्र; पश्चिम रेल्वेवर ५, तर मध्य रेल्वेवर २ घटना

नीट पेपरफुटीप्रकरणी बुधवारपासून सुनावणी

Mumbai : पवई तलावावर देशातील सर्वांत भव्य म्युझिकल फाऊंटन; ३० कोटींच्या प्रकल्पाचे आज उद्घाटन, शिवरायांची शौर्यगाथा साकारणार