रवी मट्या पाटील व नितीन मट्या पाटील  
ठाणे

Dombivli : दोन माजी नगरसेवकांसह शिंदे गटाच्या १२ जणांविरोधात गुन्हा

भाजप उमेदवाराच्या पतीवर हल्ल्याप्रकरणी शिंदे गटाच्या दोन माजी नगरसेवकांसह १२ जणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीच्या काळात डोंबिवलीतील सुनीलनगर प्रभागात भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती सोमनाथ नाटेकर यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक रवी मट्या पाटील व नितीन मट्या पाटील यांच्यासह १२ जणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा हा गुन्हा पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या वाहनास अडथळा

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या काळात प्रचारासाठी पैसे वाटप केल्याच्या संशयावरून पोलीस कारवाई सुरू असताना आरोपींनी पोलिसांच्या वाहनास अडथळा आणून आरडाओरडा केल्याचा आरोप आहे. जमावबंदी आदेशांचे उल्लंघन करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती सोमनाथ नाटेकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला, मारहाण व शिवीगाळ केल्याचा स्वतंत्र गुन्हा नितीन पाटील, रवी पाटील व त्यांच्या साथीदारांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींच्या आजारपणाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून चौकशी करण्याची मागणी तक्रारदार सोमनाथ नाटेकर यांनी केली असून, पाटील बंधूंना जामीन मिळावा, यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

न्यायालयाने पाटील बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला

शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन मट्या पाटील आणि रवी मट्या पाटील यांचा जामीन अर्ज कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे. भाजप नगरसेविकेचे पती सोमनाथ नाटेकर यांच्यावर निवडणूक काळात धारदार शस्त्राने हल्ला व मारहाण केल्याप्रकरणी खुनाचा प्रयत्न तसेच बेकायदा जमाव जमवल्याच्या गुन्ह्यात रामनगर पोलिसांना पाटील बंधूंची चौकशीसाठी आवश्यकता आहे. कल्याण सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत तपासासाठी आरोपींची अटक आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने जामीन नाकारला.

राज्यात ॲनालॉग पनीरवर बंदी; हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना FDA चे आदेश

Nagpur : इंस्टाग्रामवर मैत्री, 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्... १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अत्याचार, ठाण्याच्या तरुणाला अटक

नालासोपारा-वसईदरम्यान लोकलसमोर उभा राहिला माथेफिरू; संतप्त प्रवाशाने कानशिलात लगावत हटवलं, पाहा Video

बनावट कागदपत्रे सादर केल्यास प्रवेश रद्द होणार; विद्यार्थ्याविरुद्ध होणार कारवाई, CET कक्षाचा निर्णय

Mumbai : बेस्टच्या ताफ्यात १,५०० नव्या बसेस; BEST समितीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी