प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

Dombivli News : डोंबिवलीत उद्या ९ तास पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

वेळेत दुरुस्ती न केल्यास अचानक यंत्रणा बंद पडण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नियोजित बंद ठेवून आवश्यक कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा...

किशोरी घायवट-उबाळे

डोंबिवली शहरात मंगळवारी (दि.२४ फेब्रुवारी) तब्बल ९ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेशी संबंधित दोन महत्त्वाच्या ठिकाणी तातडीची देखभाल व दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम या दोन्ही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

दुरुस्ती नेमकी कुठे?

मोहिली पंपिंग स्टेशन आणि नेतीवली जलशुद्धीकरण प्रकल्प येथे विद्युत आणि यांत्रिक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. उल्हास नदीतून काढलेले पाणी प्रथम मोहिली पंपिंग स्टेशनवर आणले जाते. त्यानंतर नेतीवली प्रकल्पात त्यावर प्रक्रिया करून ते शहरात वितरित केले जाते. या दोन्ही ठिकाणी बिघाड झाल्यास शहरातील मोठ्या भागावर थेट परिणाम होऊ शकतो.

केडीएमसीचे स्पष्टीकरण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले की, वेळेत दुरुस्ती न केल्यास अचानक यंत्रणा बंद पडण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नियोजित बंद ठेवून आवश्यक कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात अधिक काळासाठी अनपेक्षित पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

डोंबिवली पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विभागांचा पाणीपुरवठा एकाच पंपिंग व शुद्धीकरण यंत्रणेवर अवलंबून असल्याने हा परिणाम शहरभर जाणवणार आहे.

पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

नागरिकांना पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. पाण्याशी संबंधित कामांचे नियोजन त्यानुसार करावे, असेही सांगण्यात आले आहे.

मंगळवारी सायंकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे प्रशासनाने आश्वासन दिले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती