संग्रहित छायाचित्र 
ठाणे

ठाण्याचा डीपी प्लॅन बिल्डरांनी तयार केला; मुख्यमंत्र्यांच्या नावे बिल्डर लॉबीकडून करोडो रुपयांची वसुली: जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाण्याचा विकास आराखडा हा महापालिकेने नव्हे, तर बिल्डर लॉबीने तयार केला आहे. हा विकास आराखडा खारेगावला उद्ध्वस्त करणारा असून विकास आराखड्यातून जागा वाचवण्यासाठी स्क्वेअर फुटामागे पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि कळवा-मुंब्रा विधानसभेचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Swapnil S

ठाणे : ठाण्याचा विकास आराखडा हा महापालिकेने नव्हे, तर बिल्डर लॉबीने तयार केला आहे. हा विकास आराखडा खारेगावला उद्ध्वस्त करणारा असून विकास आराखड्यातून जागा वाचवण्यासाठी स्क्वेअर फुटामागे पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि कळवा-मुंब्रा विधानसभेचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून बिल्डर लॉबीकडून करोडो रुपये घेतले जात असून यामध्ये मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही. ही सर्व नावे २३ तारखेनंतर जाहीर करणार असल्याचा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन केला आहे. ठाण्याचा नवीन विकास आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला असून हा विकास आराखडाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या विकास आराखड्यात खारेगावमध्ये डीपी रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आले असून यामध्ये स्वतंत्र सैनिकांची आणि भूमिपुत्रांची घरे उध्वस्त होणार आहेत. हा रस्ता खारेगाव उद्ध्वस्त करणार आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंब्र्यामध्ये एक प्लॉट आहे, त्या ठिकाणी स्मशानभूमी आणून ठेवली आहे. मुंब्रा आणि कौसा या भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मात्र या भागांमध्ये कोणी हिंदूच नाहीये मग स्मशानभूमी कशाला आणली? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. त्या ठिकाणी स्मशानभूमी आणून ती नंतर हटवायची सुपारी आधीच कोणीतरी घेऊन घेतलेली आहे. ही सुपारी कोणी घेतली हे चौथ्या मजल्यावर जाणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे. पैशाच्या थैल्या पोहोचल्या कुठे, कोणी घेतले हे सगळं मला माहिती आहे त्याबद्दल मला काही बोलायचे नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

खारेगावमधून डीपी रस्ता काढणे हे म्हणजे खारेगाव उद्ध्वस्त करणारे आहे हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे. ही आगरी समाजाच्या विरोधात भूमिका आहे. मी सध्याचे आयुक्त सौरभ राव यांच्याविषयी बोलत नाही, मात्र जोपर्यंत महापालिकेला दणका बसत नाही, जोपर्यंत यापूर्वी ज्यांनी हे काम केले ते कमिशनर जेलमध्ये जात नाहीत तोपर्यंत महापालिकेला दणका बसणार नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले. झालेल्या सगळ्या गोष्टी आयुक्तांना माहिती आहे, की व्यायाम शाळा अनधिकृत आहे. मात्र तोडण्याची हिंमत कोणीच दाखवत नाही.

महापालिकेच्या आयुक्तांना एकच विचारणा आहे की त्याला नोटीस देऊनही आजपर्यंत बांधकाम का तोडण्यात आले नाही. पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि मंत्रालयात बसलेले अधिकारी बसून डीपी प्लॅन बनवतात. हा डीपी प्लॅन कुठे बनवला, कसा बनवला, याच्या कहाण्या भलत्याच आहेत.

२३ तारखेला नावे जाहीर करणार

मी या डीपी प्लानमध्ये एवढी जागा सोडून देतो, म्हणून स्क्वेअर फुटामागे पैसे घेतले जातात. यासाठी काही माणसं फिरत होती बाजारामध्ये आणि उघड उघड भ्रष्टाचार केला जात होता. अशा प्रकरणामुळे मुख्यमंत्री निष्कारण बदनाम होतात. मुख्यमंत्र्यांनी एकही रुपये नाही घेतला, पण या माणसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून बिल्डर लॉबीकडून करोडो रुपये घेतले असून ही माणसे कोण आहे, हे २३ तारखेला जाहीर करेन, असा इशारा देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?