ठाणे

कर्जतमध्ये पाणी टँकरसाठी ५१ लाखांची तरतूद; ६० वाड्या, १८ गावांकडून टँकरची मागणी

Swapnil S

विजय मांडे/ कर्जत

कर्जत तालुक्यात यावर्षी ६० आदिवासी वाड्या आणि १८ गावे पाणीटंचाई ग्रस्त आहेत. त्या सर्व ठिकाणी पिण्याचे पाणी टँकरचे माध्यमातून पुरविण्यासाठी पाणीटंचाई कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. कर्जतमधील पाणीटंचाई लक्षात घेता टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ५१ लाखाची तरतूद करण्यात आली. पाणीटंचाई वाढल्याने यंदा पंधरा दिवस आधीच पहिला पाणी टँकर शासनाचे वतीने सुरू करण्यात आला. आणखी चार गावे-वाड्यामध्ये टँकर सुरू करण्याची मागणी कर्जत पंचायत समितीकडे आली आहे.

तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींमधील पिण्याच्या पाण्याची उन्हाळ्यातील स्थिती लक्षात घेऊन जानेवारीमध्ये कर्जत पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यावेळी आमदार, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता यांच्या उपस्थितीत चर्चा करून तालुक्यातील १८ गावे आणि ६० आदिवासी वाड्यांचा समावेश पाणीटंचाई कृती आराखड्यात करण्यात आला. मात्र, यावर्षी होळीनंतर उष्म्यात वाढ झाली आणि शेवटी मागणीनुसार तालुक्यात शासनाचा पहिला टँकर सुरू करण्यात आला. उमरोली ग्रामपंचायतीमधील आषाणे गावात पहिला टँकर सुरू झाला. शासनाचा पहिला टँकर आल्यानंतर आता तालुक्याच्या अन्य भागातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाथरज ग्रामपंचायतीमधील मेचकरवाडी, पिंगळस, जांभुळ वाडी आणि धामणी या चार ठिकाणी शासनाचे पाणी टँकर देण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहेत. त्यानुसार पंचायत समितीकडून पडताळले जाणार आहेत. त्या सर्व वाड्या आणि गावांमध्ये भूजल सर्वेक्षण टीम तेथे जाऊन पाहणी करणार आहे. त्यांनुसार टँकरचा पुरवठा केला जाणार आहे.

सध्या एक टँकर आला आहे. आणखी टँकर येणार असून या सर्व टँकरमध्ये जीपीआरएस प्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे टँकर ठरवून दिलेल्या गावे व वाड्यांवर वेळेत पोहोचतो की नाही? हे पाहता येणार आहे.

- गोवर्धन नखाते, कर्जत पंचायत समिती

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त