ठाणे

एकनाथ खडसे यांच्या बंगल्यातील चोरी प्रकरणाचे उल्हासनगर कनेक्शन! चोरट्यांचा मागोवा थेट उल्हासनगरपर्यंत; तपासाचा थरार वाढला

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्या जळगावातील आलिशान बंगल्यात झालेल्या चोरी प्रकरणात आता उल्हासनगर कनेक्शन उघड झाले आहे.

Swapnil S

उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्या जळगावातील आलिशान बंगल्यात झालेल्या चोरी प्रकरणात आता उल्हासनगर कनेक्शन उघड झाले आहे.

या प्रकरणातील संशयित उल्हासनगरातील दोन सख्खे सराईत गुन्हेगार भाऊ असल्याचे समोर आले असून, त्यांच्या शोधासाठी जळगाव पोलिसांचे विशेष पथक बुधवारी मध्यरात्री उल्हासनगरात दाखल झाले होते. जळगावातील शिवराम नगर येथील खडसे यांच्या बंगल्यातील चोरीनंतर केवळ दोन दिवसांतच तपास नव्या दिशेने वळला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जळगाव पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलिसांसह संयुक्त मोहीम राबवून संशयितांचा शोध सुरू केला आहे.

उल्हासनगरमध्ये सर्च ऑपरेशन

तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासात संशयित आरोपी उल्हासनगरातील विठ्ठलवाडी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, जळगाव पोलिसांचे पथक बुधवारी मध्यरात्री उल्हासनगरात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत संयुक्त शोधमोहीम आणि सर्च ऑपरेशन राबवण्यात आले, ज्यामुळे उल्हासनगरातही खळबळ उडाली आहे.

तपास निर्णायक टप्प्यात

सध्या काही संशयितांची चौकशी सुरू असून, पोलीस “सर्व शक्यता तपासात घेत आहेत. आरोपींचा लवकरच पर्दाफाश होईल,” असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात चोरीमागे राजकीय हेतू आहे की फक्त आर्थिक स्वार्थ, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र उल्हासनगरचा धागा समोर आल्यानंतर ही चोरी आता राज्यस्तरीय चर्चेचा विषय ठरली आहे.

दागिन्यांपेक्षा दस्तावेजांचा शोध !

दोन दिवसांपूर्वी झालेल्या या चोरीत सात ते आठ तोळे सोनं आणि सुमारे ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली. मात्र तपासात हे प्रकरण केवळ भुरट्या चोरीपुरते मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरट्यांनी घरातील विशिष्ट कपाटांतील फाइल्स, सीडीज आणि पेन ड्राइव्हच नेमके लक्ष्य केले, यामुळे हेतूबाबत संशय निर्माण झाला आहे. चोरी केवळ मालमत्तेच्या लालसेसाठी नसून, महत्त्वाची माहिती हस्तगत करण्याच्या उद्देशाने झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक