ठाणे

भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरे जप्त

Swapnil S

भिवंडी : शहरात बनावट जिरे विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून ७ लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा २३९९ किलो बनावट जिरे शांतीनगर पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

शादाब इस्लाम खान (३३) व चेतन रमेशभाई गांधी (३४) असे बनावट जिरेप्रकरणी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९० फूट रोड, नागाव फातमा नगर येथे बनावट जिरे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. एम. घुगे व पोलीस शिपाई क्षीरसागर यांना मिळाली होती. शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नागाव फातमानगर येथे सापळा लावला असता या ठिकाणी टेम्पोत बनावट जीरा आढळला.

पोलिसांनी टेम्पोतून आणलेल्या ८० गोण्यामधील ७ लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा मधून सुमारे साडेतीन टन बनावट जिरे व ४ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी चेतन गांधी याने मे. जागृती इंटरप्राईजेस नोबेल इंडस्ट्रियल इस्टेट मनोर जि.पालघर या ठिकाणी शासनाची परवानगी न घेता बनावट जिऱ्याची फॅक्टरी उघडली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस