ठाणे

Bhiwandi : रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधी करण्यावरून दोन कुटुंबामध्ये हाणामारी, तिघांना अटक

सकाळी उठल्यावर नैसर्गिक विधीला जाण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली.

Swapnil S

भिवंडी : सकाळी उठल्यावर नैसर्गिक विधीला जाण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील ठाकराचा पाडा येथून समोर आली आहे. याप्रकरणी एका कुटुंबातील तिघांवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. वरुण चंद्रकांत श्रीकर (४३),पार्थ वरुण श्रीकर (२०), दर्शना वरुण श्रीकर (४१) अशी अटक केलेल्या कुटुंबीयांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमान रतन ठाकरे हा ठाकूरपाडा गावात राहत असून त्याचा हॉटेलचा व्यवसाय आहे. दरम्यान १७ जून रोजी रात्री पाऊणे दहाच्या सुमारास नाशिक- मुंबई हायवेवरील ठाकराचा पाडा येथील बासुरी हॉटेलच्या बाजूला रत्नदीप खानावळसमोर श्रीकर कुटुंब आणि हनुमान यांच्यात रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधी करण्याच्या कारणावरून क्षुल्लक वाद झाला होता. दरम्यान हा वाद उफाळून आल्याने श्रीकर कुटुंबाने आपसात संगनमत करून हनुमानसह त्याच्या पत्नी व मुलीला मारहाण केली. तसेच पार्थने लोखंडी कड्याने हनुमानच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. याप्रकरणी तिघांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि गायकवाड करीत आहेत.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी