ठाणे

सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीला भिवंडी पोलिसांकडून अटक

या दरोडेखोरांकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील एकूण १४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे

Swapnil S

भिवंडी : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या अट्टल दरोडेखोर टोळीला भिवंडीतील नारपोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ईशान अब्दुल रेहमान शेख (४०), शहबान मोहम्मद सलीम शेख (३४), अहमद हुसेन सत्तार सावत उर्फ सलीम (४७), वजीर मोहम्मद हुसेन सावत उर्फ कान्या (३५), रेहान कब्बन सय्यद (२१), गुलामअली लालमोहम्मद खान (१९), हसन मेहंदी शेख (२६), सलीम फत्तेमोहम्मद अन्सारी उर्फ सलीम हाकला (३९), प्रमोदकुमार बन्सबहादुर सिंग (४६) अशी अटक करण्यात आलेल्या ९ जणांची नावे असून हे सगळे मुंबईत राहणारे आहेत.

या दरोडेखोरांकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील एकूण १४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,१३ डिसेंबर रोजी मानकोली येथील प्रभात केबल्स प्रा.लि. या वेअर हाऊसमध्ये अज्ञात १३ जणांनी टेम्पोमधून येवून सशस्त्र जबरीने कामगारांना मारहाण करीत दरोडा टाकून दरोडेखोर फरार झाले होते.

याप्रकरणी अज्ञातांवर नारपोली पोलीस ठाण्यात विकास हिंदूराव पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान नारपोली पोलीस ठाण्याचे वपोनि भरत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान व शहबाज या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे अन्य ७ जणांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या.

Traffic Challan : ई-चलन भरलं नाही तर वीज बिलात जोडणार दंडाची रक्कम? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा इशारा

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

UMANG App : पीएफच्या कामासाठी आता EPFO ऑफिसच्या फेऱ्या नको! घरबसल्या करता येतील ही १० महत्त्वाची कामं