ठाणे

घोडबंदर रोडवर भीषण अपघात; विद्युत खांबाला ट्रकची जोरदार धडक; दोघांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

घोडबंदर रोडवरील पातलीपाडा उड्डाणपुलावर मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भीषण अपघात घडला. नवी मुंबईहून सुमारे ८ टन लोखंडी पाइप व रॉड घेऊन गुजरातकडे निघालेल्या ट्रकने दुभाजकावरील विद्युत खांबाला जोरदार धडक दिली.

Swapnil S

ठाणे : घोडबंदर रोडवरील पातलीपाडा उड्डाणपुलावर मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भीषण अपघात घडला. नवी मुंबईहून सुमारे ८ टन लोखंडी पाइप व रॉड घेऊन गुजरातकडे निघालेल्या ट्रकने दुभाजकावरील विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत ट्रकचालक विनोद (४२) आणि हेल्पर रहीम पठण (२५) या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी होते.

अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या केबिनमध्ये दोघेही अडकले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अडकलेल्या चालक व हेल्परला बाहेर काढून तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

धडकेमुळे ट्रकमधील लोखंडी पाइप आणि रॉड रस्त्यावर विखुरले गेले होते. हे साहित्य हायड्रा मशीनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. अपघातानंतर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती. दरम्यान, वाहतूक सेवा पर्यायी मार्गांवरून अत्यंत धीम्या गतीने सुरू ठेवण्यात आली होती.

न्या. वर्मा यांच्या याचिकेवरील सुनावणीतून सरन्यायाधीशांची माघार; विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येणार

2006 Mumbai Local Train Blasts : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, सुटलेल्या आरोपींचं काय होणार?

चाकरमान्यांना बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी ST ची ३०% भाडेवाढ अखेर रद्द

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आयोगाकडून सुरू

सूरज चव्हाण अखेर शरण; जामिनावर सुटका