ठाणे

ठाण्यासाठी शुक्रवारी रेड अलर्ट, आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज

हवामान खात्याने ठाण्याला रेड अलर्ट जाहीर केला होता, त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे शहरात गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून एका दिवसात १८० मिमी इतका पाऊस झालेला आहे. तसेच हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला होता, त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच उद्या देखील मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आयुक्तांना संबंधितांना दिले.

शुक्रवारी देखील मोठी भरती असून रेड अलर्ट जाहीर केला असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले. तसेच नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रभाग समिती निहाय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच शहरातील सखल भागात पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीकोनातून पंप बसविण्यात आले असून पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे मुंब्रा परिसरातील खडी मशीन रोड व भीमनगर येथील रस्ता खचल्यामुळे आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरची परिस्थिती नियंत्रणात आणून सदर ठिकाणचा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी पावसामुळे उन्मळून पडलेली झाडे तातडीने हटविण्याची कार्यवाही सुरू आहे.

संजय राऊतांच्या वक्तव्याने मनसेत नाराजी, संदीप देशपांडे म्हणाले, "आमच्या पक्षाची भूमिका...

विरारमध्ये ‘वचनपूर्ती जल उत्सव’ कार्यक्रमासाठी रस्ता अडवल्याने गोंधळ; भाजप, बविआ आणि नागरिकांमध्ये संघर्ष

Mumbai : खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड; तातडीने रुग्णालयात दाखल

Thane News : कबूतराला वाचवायला गेला, अग्निशामक जवानाने जीव गमावला; २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, परिसरात हळहळ

Diwali Rangoli Ideas : पारंपरिक ठिपक्यांपासून मॉडर्न डिझाइन्सपर्यंत! घर सजवण्यासाठी रांगोळीचे खास पर्याय