ठाणे

कळमगाव येथे आगीत घर खाक

या आगीत जीवितहानी सुदैवाने झाली नाही; मात्र घरातील अन्नधान्य व अन्य समान जळून नष्ट झाले.

Swapnil S

शहापूर : शहापूर तालुक्यातील कलमगाव येथील रहिवाशी जगन्नाथ पातकर यांच्या राहत्या घराला शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात घर संपूर्ण जळून खाक झाले. या आगीत जीवितहानी सुदैवाने झाली नाही; मात्र घरातील अन्नधान्य व अन्य समान जळून नष्ट झाले. या घटनेची माहिती केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना कळताच त्यांनी या कुटुंबीयांची भेट घेवून त्यांना आर्थिक मदत करण्याच्या सूचना त्यांचे स्विय सहाय्यक नंदकुमार कापसे यांना केली. त्यानुसार कापसे यांनी या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.

राज्यात सूर्य आग ओकतोय; उष्माघाताने परभणीत एकाचा मृत्यू, अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी

खरातच्या फार्महाउसमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ हाती; आचाऱ्याकडून काळ्या कृत्यांचा भांडाफोड, CCTV फुटेज ‘एसआयटी’कडे

निफाडच्या भोंदूबाबाने आपला प्रपंच केला उद्ध्वस्त...

१७ जागांसाठी जूनमध्ये रणधुमाळी; विधान परिषद स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

ट्रम्प पुन्हा हल्ल्यातून बचावले; व्हाईट हाऊसच्या डिनरदरम्यान गोळीबार, हल्लेखोराला अटक