ठाणे

बदलापूरात शिवसेनेच्या पक्षबांधणीला पुन्हा एकदा जोमाने सुरुवात

नुकतेच शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी बदलापुरात किशोर पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली

वृत्तसंस्था

बदलापूरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा बदलापुरात जोमाने शिवसेना पक्षबांधणी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

नुकतेच शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी बदलापुरात किशोर पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी बदलापुरात पुन्हा शिवसेना बळकट करण्याच्या दृष्टीने कशाप्रकारे पक्षबांधणी करावी लागेल, काही कारणास्तव मुख्य प्रवाहातून बाजूला गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, ज्या पदाधिकाऱ्यांना वा माजी नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत यायची इच्छा असेल त्यांच्याशी कशाप्रकारे संपर्क साधायचा आदी विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. बदलापुरातील काही माजी नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असून रुपेश म्हात्रे त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे योग्य नियोजन करून पक्षबांधणी केली जाणार असून त्यामुळे निश्चितच बदलापुरात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वासही किशोर पाटील यांनी व्यक्त केला.

चार दिवसांपूर्वीच बदलापूरातील शिवसेनेचे विभाग प्रमुख किशोर पाटील, माजी नगरसेवक बाळा पातकर, माजी उपनगराध्यक्ष प्रिया गवळी, उपशहर प्रमुख प्रशांत पालांडे, गिरीश राणे , नरेश मेहेर , संतोष शिंदे ,विलास हंकारे, श्याम शिंदे, रामलू डोरापल्ली, लक्ष्मीकांत कौसुंदर, बाळकृष्ण पाटील, कुणाल साळवे, धनंजय पावसकर, तेजस गंद्रे, आदींसह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे आगामी काळात पक्ष बांधणीत व शिवसंवाद यात्रेला बदलापुरात पूर्वीचाच जोश व उत्साह दिसून येईल,अशी ग्वाही दिली होती.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला