इन्स्टाग्राम रील्सची भुरळ महागात; मलंगगडावर अडकलेल्या तिघांची मध्यरात्री थरारक सुटका 
ठाणे

Ulhasnagar : इन्स्टाग्राम रील्सची भुरळ महागात; मलंगगडावर अडकलेल्या तिघांची मध्यरात्री थरारक सुटका

इन्स्टाग्रामवरील ट्रेकिंग रील्सची भुरळ तीन तरुणांना चांगलीच महागात पडली. मलंगगडावरील धोकादायक मामा-भांजे टेकडीवर चढल्यानंतर उतरताना ते अडकून पडल्याने त्यांच्या जीवावर बेतले होते.

Swapnil S

उल्हासनगर : इन्स्टाग्रामवरील ट्रेकिंग रील्सची भुरळ तीन तरुणांना चांगलीच महागात पडली. मलंगगडावरील धोकादायक मामा-भांजे टेकडीवर चढल्यानंतर उतरताना ते अडकून पडल्याने त्यांच्या जीवावर बेतले होते. अखेर मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिलेल्या थरारक बचाव मोहिमेत उल्हासनगरातील हिललाइन पोलीस ठाणे, अग्निशमन दल आणि स्थानिक गावकऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तिघांची सुखरूप सुटका करण्यात आली.

मलंगगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तीन तरुणांची मध्यरात्री थरारक बचाव मोहीम राबवून सुटका करण्यात आली. मालाड परिसरातील शिवम सिंग, मंगेश प्रजापती आणि गुरुप्रसाद विश्वकर्मा हे तिघे मलंगगडावरील मामा-भांजे टेकडीवर फिरण्यासाठी आले होते. टेकडीवर चढण्यात त्यांना यश आले, मात्र उतरताना मार्गाचा अंदाज न आल्याने ते एका उंच आणि धोकादायक कड्यावर अडकून पडले. याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस नियंत्रण कक्षाला मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पथक, हिललाइन पोलीस तसेच स्थानिक गावकरी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अंधार, उंच कडा आणि अवघड भूभागामुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरले. तरीही अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक गावकऱ्यांनी समन्वयाने राबविलेल्या प्रयत्नांमुळे मध्यरात्री उशिरा तिन्ही तरुणांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल