उल्हासनगर-अंबरनाथदरम्यान ट्रॅकवर लोखंडी बॉक्स 
ठाणे

उल्हासनगर-अंबरनाथदरम्यान ट्रॅकवर लोखंडी बॉक्स

उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान मंगळवारी पहाटे डाउन मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर संशयास्पद लोखंडी बॉक्स आढळल्याने काही काळ उडाली.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान मंगळवारी पहाटे डाउन मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर संशयास्पद लोखंडी बॉक्स आढळल्याने काही काळ उडाली. मात्र, खळबळ मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा रेल्वे अपघात टळला. या घटनेमुळे सुमारे १२ मिनिटे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

ठाणेहून कर्जतकडे जाणारी लोकल चालवत असलेले मोटरमन आर. एस. सैनी यांना पहाटे ५.४४ वाजण्याच्या सुमारास ट्रॅकवर लोखंडी बॉक्स दिसला. त्यांनी तत्काळ लोकल थांबवून रेल्वे प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बॉक्स सुरक्षितपणे ट्रॅकवरून हटविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच बदलापूर येथील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि शासकीय रेल्वे पोलिसांचे (जीआरपी) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बॉक्स हटविल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत सतर्कता वाढविली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे सांगण्यात आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

Mumbai Ganeshotsav 2026 : बाप्पासाठी चक्क रेल्वे; मूषक झाले प्रवासी, सोशल मीडियावर Video व्हायरल

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

Ganeshotsav 2026 : गणपती दर्शनाला ठाण्यात जाताय? 'या' मंडळांना नक्की भेट द्या

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण