क्लस्टरच्या नावाखाली ठाणे बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव; आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप  संग्रहित छायाचित्र
ठाणे

क्लस्टरच्या नावाखाली ठाणे बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव; आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाणे : क्लस्टर म्हणजे ठाणे बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. लँडबँकच्या माध्यमातून बिल्डर्स आपला ॲसेट व्हॅल्यू (भांडवली मूल्य) वाढवितात अन् ॲसेट व्हॅल्यू (भांडवली मूल्य) वाढवून स्वतःच्या धन निर्मितीसाठी त्याचा फायदा करून घेतात. त्यास ठाणे महानगर पालिकेकडून हातभार लावला जात आहे.

Swapnil S

ठाणे : क्लस्टर म्हणजे ठाणे बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. लँडबँकच्या माध्यमातून बिल्डर्स आपला ॲसेट व्हॅल्यू (भांडवली मूल्य) वाढवितात अन् ॲसेट व्हॅल्यू (भांडवली मूल्य) वाढवून स्वतःच्या धन निर्मितीसाठी त्याचा फायदा करून घेतात. त्यास ठाणे महानगर पालिकेकडून हातभार लावला जात आहे. ठाणे महानगर पालिकेचे जे काम नाही ते काम महानगर पालिका विशेष रूची घेऊन करीत आहे. असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे केले आहेत.

शहरात पाणी नाही, शहरातील कचरा उचलला जात नाही. शहरातील महत्वाचे रस्ते खोदून ठेवले आहेत. अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. याकडे लक्ष न देता, म्हाडाच्या जमिनी कशा ताब्यात घ्यायच्या, यासाठी पत्रव्यवहार सुरू आहेत. गोरगरीबांनी आपल्या पक्क्या घरांची स्वप्ने ज्या एसआरएच्या माध्यमातून पाहिली, त्या एसआरएला देखील गेली अनेक वर्षे कपाटात बंद करून ठेवली आहे अन् सगळे डोळे फक्त क्लस्टरकडे लावले आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे. क्लस्टर का व कशासाठी, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.

दोन कुठल्या तरी बिल्डर्सना, जे भारतातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या शंभरमध्ये आहेत. त्या बिल्डर्सला पहिल्या २० मध्ये आणण्यासाठी ठाणे महानगर पालिका त्यांना मदत करीत आहे. ठाणे महानगर पालिकेचे जे काम आहे ते करीतच नाहीत. मात्र गोरगरीबांची घरे उद्ध्वस्त करण्याचे काम अगदी रस घेऊन करीत आहेत. हे करतात कोणासाठी नेमके? कोण आहेत ते बिल्डर्स, ज्यांच्यासाठी हा कट रचला जातोय. ठाण्याच्या मध्यवर्ती भागात सध्या कोणाची कामे चालू आहेत? कोणी मोठ्या - मोठ्या जमिनी विकत घेतल्या आहेत? त्या बिल्डर्सची नावे फुटणारच आहेत असेही त्यांनी सांगितले.

म्हाडा वसाहतींना पुनर्विकासाचे वेध

ठाण्यात शिवाजीनगर सारखी एक जुनी लोकवस्ती आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर म्हाडा वसाहती आहे. या म्हाडा वसाहतींमधून वर्षानुवर्ष राहणाऱ्या रहिवाशांना आता पुनर्विकासाचे वेध लागले आहेत. पुनर्विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या लोकांना क्लस्टरचा फास लावण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे होत आहे. म्हाडा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पुनर्विकासाचा अधिकार नाही का? क्लस्टरचा फास त्यांच्या भोवती कोण आवळत आहे? लोकांनी न्यायालयीन लढा दिल्यावरच महापालिकेला आणि संबंधित राजकीय नेत्यांना शहाणपण येणार का? क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या बिल्डरांचे हित साधू पाहणारे हे नेते कोण आहेत? असा सवालही त्यांनी केला आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल