राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अखेर ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर त्यांच्यासह इतर १२ जणांनादेखील जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा चालू शो बंद पाडण्यात आला. यावेळी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षक मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवला असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चालू असलेला शो बंद पाडला. यावेळी तिथे एका प्रेक्षकाला मारहाणदेखील केली. त्यानंतर त्यांना ठाणे पोलिसांकडून अटक झाली आणि आज १२ नोव्हेंबरला त्यांना ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. ठाणे कोर्टात दोन्ही वकिलांमध्ये झालेल्या युक्तिवादानंतर जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, त्यानंतर लगेचच जितेंद्र आव्हाड यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला.