ठाणे

कल्याण - डोंबिवलीमध्ये स्वाईन फ्ल्यूचे १८ रुग्ण; विलगीकरण कक्षासाठी पालिका सज्ज

वृत्तसंस्था

पावसाळा सुरू झाल्यापासून तापाच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे. स्वाईन फ्ल्यू रुग्णांनी देखील डोक वर काढले आहे. कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत स्वाईन फ्ल्यूचे १८ रुग्ण आढल्याचे तपासात समोर आले आहे. पालिकेचे आरोग्य विभाग सज्ज झाले असून कल्याणच्या रुक्मिणीबाई आणि डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय येथे १० – १० बेडचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या साथरोग तज्ञ डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत १७३ जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. सर्वात जास्त ४३ इतके रुग्ण मुंबईत आढळले आहेत. ठाण्यात २० रुग्ण आहेत. कल्याण डोंबिवलीत - महापालिका हद्दीत तापाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हा आकडा ७ हजारावर गेला आहे. जून महिन्यापासून आता पर्यंत स्वाईन फ्ल्यूच्या या १८ रुग्णांची नोंद झाली आहे. स्वाईन फ्ल्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेने विलगीकरण कक्षची स्थापना केली आहे. हे विलगीकरण कक्ष कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आणि डोंबिवलीच्या शासत्रीनगर रुग्णालयात १० – १० बेड तयारीत ठेवले आहे.

याव्यतिरिक्त गॅस्ट्रो – ४३, कावीळ – १७, टायफाईड – ५९, डेंग्यू -१२, लेप्तो – १, मलेरिया – ४ अशा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या साथरोग अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आतापर्यंत रुग्ण सापडलेल्या परिसरातील लाखो घरांचे सर्वेक्षण आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. त्यांना आरोग्याबाबत माहिती सांगण्यात आली आहे. तसेच स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष देखील तयार करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि ताप आला तर त्वरित आरोग्य केंद्रात तपासणी करू घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत केले जात असल्याचे डॉ. पानपाटील यांनी सांगितले आहे.

लक्षणे आणि काळजी

ताप, कोरडा खोकला, घशात खवखव, भूक मंदावणे, डोके दुखणे, अशक्तपणा वाटणे ही स्वाईन फ्लूची लक्षणे असून ती जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Video : घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग BPCLपेट्रोल पंपावर कोसळलं, १०-१५ जण राजावाडी रुग्णालयात भरती

Video : मतदान केंद्रावरच भिडले आमदार आणि मतदार, तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल...

पुण्यातील धक्कादायक प्रकार! चक्क काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावे बोगस मतदान; मतदान न करताच फिरावं लागलं माघारी

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ५ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

कल मतदारसंघाचा : ईशान्य मुंबईत अटीतटीची लढत; मिहिर कोटेचा, संजय दिना पाटील यांचा कस लागणार