प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प

कल्याण शहर आणि कल्याण शहर आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मंगळवारी (ता. २८) पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याण शहर आणि कल्याण शहर आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मंगळवारी (ता. २८) पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. बारावे आणि मोहिली येथील कच्चे पाणी उचलण्याच्या यंत्रणेत गाळ, माती व पालापाचोळा काढण्याचे काम सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत होणार आहे.

या काळात नागरिकांनी पाणी बचतीचा विशेष प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच काळात विद्युत उपकरणांची देखभालही केली जाणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चिंचपाडा, कैलासनगर, वालधुनी, विजयनगर, नेतिवली, चक्कीनाका, पत्रीपूल, लोकग्राम तसेच कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्ता, बेतुरकरपाडा, बिर्ला महाविद्यालय परिसर, खडकपाडा, पारनाका, दूधनाका, गोविंदवाडी, आधारवाडी, गंधारे, बारावे, शहाड, आंबिवली, मोहने, धाकटे शहाड, बंदरपाडा, अटाळी परिसर या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तपासात फेरफाराची भीती; पुढील निर्णय घेण्यापूर्वी महिनाभर तपासावर लक्ष ठेवणार- जरांगे

भारताचा हेतू योग्य नाही, पाकिस्तानमुळे काश्मिरी सुरक्षित; डॉ. फारुख अब्दुल्ला यांचे धक्कादायक वक्तव्य

देशातील मतदार याद्यांचीच चौकशी करा! उत्तर प्रदेशातील मतदार यादीत त्रुटी आढळल्यानंतर काँग्रेसची भूमिका

एशियाटिकमधील वंदे मातरम् अपमान प्रकरण : डॉ. मुणगेकरांवर कारवाईची टांगती तलवार

Kojagiri Purnima 2026 : आज कोजागिरी पौर्णिमा; चंद्रोदय किती वाजता? जाणून घ्या पूजेचा मुहूर्त