ठाणे

अवैध मांस विक्रेत्यांवर केडीएमसीची धडक कारवाई

Swapnil S

कल्याण : महानगरपालिका क्षेत्रात अवैधरीत्या म्हैसवर्ग जनावराचे मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर शुक्रवारी महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागामार्फत धडक कारवाई करण्यात आली. महापालिका हद्दीत विनायक कॉलनी चाळ, विठ्ठलवाडी बस आगारजवळ कल्याण (पू), रामनगर खदान टेकडी, नेतिवली, सूचक नाका, गफूर डॉन शाळेच्या शेजारी, मेट्रो मॉलसमोर काही दुकानदार हे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता म्हैसवर्ग जनावराचे मांस विक्री करीत असल्याची माहिती बाजार व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रसाद ठाकूर यांना मिळाली होती. सदर दुकानांवर कारवाई करण्यासंदर्भात या विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली.

प्रथमत: विनायक कॉलनी चाळ, विठ्ठलवाडी बस आगारजवळ शौकत कुरेशी व त्यांचा कामगार हे अवैधरित्या मांस विक्री करीत होते. बाजार परवाना पथकाने तेथे धाड टाकून १० किलो मांस जप्त करून दुकानाचा गाळा सिल केला. यापूर्वी देखील बाजार परवाना विभागाने शौकत कुरेशी यांचा परवाना क्रं.केएम १०४ रद्द केला आहे. नंतर रामनगर खदान टेकडी, नेतिवली, येथे धाड टाकली असता सदरहू दूकानदार दुकान बंद करून पळून गेला. मेट्रो मॉल समोरील गफूर डॉन शाळेच्या शेजारी युसुफ गौसू शेख यांच्या दुकानातून ५ किलो मांस जप्त करून सदरचा गाळा सिल करण्यात आला आहे. याप्रसंगी बाजार परवाना विभागातील प्रशांत धिवर, प्रांजल बागडे, सज्जाउद्दीन पिरजादे हे कर्मचारी तर गणेश वाघमोडे आणि कांगणे हे पोलीस कर्मचारी उपास्थित होते.

मांस विक्री करतांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महानगरपालिकेचा परवाना घेणे आवश्यक आहे. उपरोक्त विक्रेत्यांकडे कोणताही परवाना नसल्याने तसेच जे दुकानदार अवैधरित्या मांस विक्री करतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी सांगितले.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था