तलावात रोबोटिक स्वच्छतेचा यशस्वी प्रयोग; केडीएमसी, जान्यू टेकमुळे जलस्रोत पुनरुज्जीवनाला नवी दिशा 
ठाणे

तलावात रोबोटिक स्वच्छतेचा यशस्वी प्रयोग; केडीएमसी, जान्यू टेकमुळे जलस्रोत पुनरुज्जीवनाला नवी दिशा

मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथील सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्सने कल्याण–डोंबिवली परिसरातील जलस्रोत पुनरुज्जीवनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

Swapnil S

मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथील सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्सने कल्याण–डोंबिवली परिसरातील जलस्रोत पुनरुज्जीवनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नुकतेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील निळजे-माऊली तलावात अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिका आणि जान्यू टेक यांच्या सहकार्याने रोबोटिक तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

या प्रात्यक्षिका दरम्यान जान्यू टेक ने विकसित केलेल्या ‘मत्स्य’ या हेवी-ड्युटी स्लज क्लिनिंग रोबोटचे कार्य प्रत्यक्ष दाखविण्यात आले. हा रोबोट तलावातील तळगाळ व तरंगणारा कचरा पर्यावरणाला कमीतकमी बाधा पोहोचवून काढण्यासाठी सक्षम असून, तलाव, नद्या, कालवे व मोठ्या जलाशयांमध्ये प्रभावीपणे कार्य करू शकतो. केडीएमसी येथील अभियंते, विद्यापीठ प्रतिनिधी आणि रोबोटिक ऑपरेटर टीमच्या सक्रिय सहभागाने हे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पडले. या रोबोटच्या यशस्वी प्रात्यक्षिकानंतर केडीएमसी प्रशासनाने रोबोटच्या कार्यक्षमतेबाबत समाधान व्यक्त करत तळगाळ स्वच्छता व मध्य तलाव स्टॅकिंगसाठी अधिकृत दरपत्रक जारी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. निळजे–माऊली तलावासाठी प्रस्तावित रोबोटिक स्वच्छता प्रकल्प हा उपक्रम तंत्रज्ञानाधारित व शाश्वत जलस्रोत व्यवस्थापनाच्या दिशेने केडीएमसीच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक मानला जातो.

‘मस्त्य’ फ्लोटिंग रोबोट

‘मत्स्य’ हा जान्यू टेक यांनी विकसित केलेला फ्लोटिंग, हेवी-ड्युटी स्लज क्लिनिंग रोबोट आहे. तलाव, नद्या, कालवे व मोठ्या जलाशयांतील तळगाळ आणि तरंगणारा कचरा पर्यावरणाला कमीतकमी बाधा पोहोचवून काढण्यासाठी तो डिझाइन करण्यात आला आहे. पाण्यावर स्थिरपणे कार्य करणाऱ्या या रोबोटमुळे मानवी श्रमांवरील अवलंबन कमी होते, सुरक्षितता वाढते आणि खर्चात बचत होते. विविध जलस्रोतांमध्ये सहज वापरता येणारी त्याची रचना तलाव पुनरुज्जीवन, पाण्याची गुणवत्ता सुधारणा आणि शाश्वत जलस्रोत व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

BMC महापौर निवडणूक ३१ जानेवारीला; २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

छगन भुजबळांना क्लीनचिट : उच्च न्यायालयात दाद मागणार; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा इशारा

सोलापूरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र; राष्ट्रवादींच्या दोन्ही गटांचीही हातमिळवणी; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबईचा महापौर भाजपचाच, नाहीतर विरोधी पक्षात बसू! सुधीर मुनगंटीवार यांचा शिंदेसेनेला थेट इशारा

वारंवार एकत्र राहण्याला 'विवाह' म्हटले जाऊ शकते! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा