Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस 
ठाणे

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट

जमीन संपादन कायद्यांतर्गत सुरू असलेल्या किंवा पूर्ण झालेल्या प्रक्रियेला आव्हान देणारे दावे निकाली काढण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.

Swapnil S

मुंबई : जमीन संपादन कायद्यांतर्गत सुरू असलेल्या किंवा पूर्ण झालेल्या प्रक्रियेला आव्हान देणारे दावे निकाली काढण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.

ठाणे जिल्ह्यातील एका जमीन मालकाचे अपील फेटाळताना न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने दिवाणी व जिल्हा न्यायालयाचे पूर्वीचे आदेश कायम ठेवले. अशा प्रकारच्या जमिनीच्या प्रकरणात दिवाणी न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्यातील तळवली गावातील जमिनीच्या संपादनाचे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले होते. 'सिडको'ने औद्योगिक आणि व्यावसायिक विकासासाठी १९७० मध्ये ही जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, जमीन संपादनाचा अंतिम निवाडा कायदेशीररीत्या स्वाक्षरी करून घोषित करण्यात आला नाही, असा दावा करत नरेंद्र म्हात्रे व इतरांनी ठाण्याच्या दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भूखंड आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये वादावादी; सुधार समितीत भाजप-शिवसेना आमनेसामने, भाजप सदस्यांचा सभात्याग

मुंबई-गोवा मार्गावर अवजड वाहनांना बंदी; १९ सप्टेंबर सकाळी ८ ते २० सप्टेंबर रात्री ११पर्यंत वाहतूक बंद

Mumbai : मढ-वर्सोवा केबल स्टेड पुलाचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, १,२३७ झाडे तोडण्यास पालिकेला परवानगी

कच्च्या तेलाने शंभरी ओलांडली! जुलैनंतर पहिल्यांदाच डाॅलरचे शतक पार

Navi Mumbai : प्रौढ बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या सक्त निर्देशानंतर ऐतिहासिक पाऊल