ठाणे

महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; ठाणे जिल्ह्यात ३३८ परीक्षा केंद्र, १ लाख २१ हजार २४४ विद्यार्थी प्रविष्ठ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

Swapnil S

ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी १ लाख २१ हजार २४४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून, ३३८ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

यंदा दहावी बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा झाला. त्यामुळे उत्तीर्णांची संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होत आहे. दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडूनही नियोजन काटोकोर करण्यात आली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून, ३३८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागात ६० आणि महापालिका क्षेत्रात २७८ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर परीक्षा कामकाज २० परिरक्षक केंद्रामार्फत होणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष पथके तैनात

दहावीची परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी शिक्षण विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ६ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, प्रत्येक महापालिका व तालुकास्तरावर प्रत्येकी दोन बैठे पथके नियुक्त करण्यात आली आहेत. महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके देखील कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, परीक्षा केंद्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी भेट देतील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस