ठाणे

महेश गायकवाड अद्याप चिंताजनक -श्रीकांत शिंदे

पोलीस ठाण्यामध्येच गोळीबार केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलेले असताना शनिवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची ज्युपिटर रुग्णालयात भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली.

Swapnil S

ठाणे/प्रतिनिधी

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यामध्येच गोळीबार केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलेले असताना शनिवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची ज्युपिटर रुग्णालयात भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली.

दरम्यान, जखमी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमांना महिती देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले. ही शस्त्रक्रिया सहा तास चालली असून अद्यापही महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही ते म्हणाले.

महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी सहा गोळ्या झाडल्या असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. यामध्ये महेश गायकवाड यांच्यावर झालेला गोळीबार स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगून, याबाबत पोलीस यंत्रणा योग्य तो तपास करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शनिवारी दुपारी जखमी महेश गायकवाड यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. असं असतानाही ते शनिवारी ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचले. येथे त्यांनी गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांसोबत चर्चा केल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली.

निमित्त मावशीचे, बोलणी युतीची! उद्धव ठाकरे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला; संभाव्य युतीसाठी दोन ते तीन तास ठाकरे बंधूंमध्ये खलबते

हैदराबाद गॅझेटियरच्या जीआरबाबत सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल

ओबीसी नेतेही आक्रमक! उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत भुजबळ यांची नाराजी कायम

शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार; दसरा मेळाव्याला परवानगी

मोहन भागवत - राष्ट्रनिर्माणाचा मार्गदर्शक