Rajkumar Bhagat
ठाणे

मिथेनॉलवर चालणारे ‘अल्बर्ट मर्स्क’ जहाज जेएनपीएत दाखल; भारताला जागतिक बाजारपेठांशी जोडण्यास मदत होणार

उरण : ए.पी. मोल्लर- मर्स्क कंपनीने जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी (जेएनपीए) च्या एपीएम टर्मिनल येथे मिथेनॉलवर चालणाऱ्या जहाजाच्या नामकरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शून्य प्रदूषण उत्सर्जन करणाऱ्या या जहाजाचे नाव ‘अल्बर्ट मर्स्क’ असे ठेवण्यात आले आहे. हरित उर्जेवर कार्य करणारे मर्स्कच्या ताफ्यातील हे अकरावे जहाज आहे.

Swapnil S

उरण : ए.पी. मोल्लर- मर्स्क कंपनीने जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी (जेएनपीए) च्या एपीएम टर्मिनल येथे मिथेनॉलवर चालणाऱ्या जहाजाच्या नामकरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शून्य प्रदूषण उत्सर्जन करणाऱ्या या जहाजाचे नाव ‘अल्बर्ट मर्स्क’ असे ठेवण्यात आले आहे. हरित उर्जेवर कार्य करणारे मर्स्कच्या ताफ्यातील हे अकरावे जहाज आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी एपी मोल्लर-मर्स्कचे सीईओ व्हीन्सेंट क्लर्क, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि मर्स्क भारतासोबत विविध पैलूंवर भागीदारी करण्यास उत्सुक आहे, जसे की कमी-उत्सर्जनाच्या शिपिंगसाठी पर्यायी इंधनाचा संभाव्य स्रोत शोधणे आणि भविष्यात जहाज दुरुस्ती आणि जहाजबांधणीचा समावेश असलेले उपक्रम जे भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत असतील, शिपिंग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ते म्हणाले. मर्स्क त्याच्या ताफ्यात आणखी एक दुहेरी-इंधन जहाज जोडून डिकार्बोनाइजिंग शिपिंगच्या दिशेने ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी म्हटले. या जहाजामुळे भारताच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल.

हरित जहाजांची मागणी वाढल्याने, भारतामध्ये ग्रीन मिथेनॉल, अमोनिया आणि हायड्रोजन-आधारित इंधनाचा प्रमुख उत्पादक आणि पुरवठादार बनण्याची क्षमता आहे. भारतातील हरित इंधन उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचा मार्स्कचा निर्णय हे एक स्वागतार्ह पाऊल आहे, जे शाश्वत सागरी भविष्याकडे आपल्या प्रवासाला गती देईल. या जहाजाचे नाव देणे ही केवळ एक परंपरा नाही - ते विश्वास, सहयोग आणि भविष्यासाठी सामायिक दृष्टीचे प्रतीक आहे.

- सर्बानंद सोनोवाल, मंत्री केंद्रीय जहाज व बंदर

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल

जातवर्गीय शिक्षण वास्तव

आजचा महाराष्ट्र ड्रग माफियांच्या सावलीत

आजचे राशिभविष्य, २२ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर; कोणत्या जिल्ह्यात कोण अव्वल?