मेट्रो-५च्या टेंडर, अलाइनमेंटला सुरुवात; उल्हासनगरच्या विकासाला मिळणार नवी दिशा प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

मेट्रो-५च्या टेंडर, अलाइनमेंटला सुरुवात; उल्हासनगरच्या विकासाला मिळणार नवी दिशा

एमएमआरडीएकडून तब्बल ४,०६३ कोटींच्या मेट्रो-५ (दुर्गाडी–आधारवाडी–खडकपाडा–उल्हासनगर) प्रकल्पाच्या सुधारित डीपीआरला शासनाची मंजुरी मिळाल्याची अंतिम मार्ग अधिसूचनेची प्रक्रिया सुरू असल्याची तसेच सल्लागार नियुक्ती व टेंडर प्रक्रियेलाही वेग आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : एमएमआरडीएकडून तब्बल ४,०६३ कोटींच्या मेट्रो-५ (दुर्गाडी–आधारवाडी–खडकपाडा–उल्हासनगर) प्रकल्पाच्या सुधारित डीपीआरला शासनाची मंजुरी मिळाल्याची अंतिम मार्ग अधिसूचनेची प्रक्रिया सुरू असल्याची तसेच सल्लागार नियुक्ती व टेंडर प्रक्रियेलाही वेग आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी पाठपुरावा केला होता.

मुंबई मेट्रो-५ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुर्गाडी–आधारवाडी–खडकपाडा–उल्हासनगर या सुमारे ४,०६३ कोटींच्या प्रकल्पाबाबत आमदार कुमार आयलानी यांनी शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने एमएमआरडीएला पत्र पाठवून काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली तसेच ९५ दिवसांच्या कृती आराखड्याची, निविदा प्रक्रियेची, अंतिम अलाइनमेंटची आणि प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती मागवली. उत्तरादाखल एमएमआरडीएने सुधारित डीपीआरला मंजुरी मिळाल्याचे, मार्ग अधिसूचनेसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याचे, सल्लागार नियुक्तीसाठी निविदा आणि सिव्हिल कामांसाठी टेंडर दस्तावेज तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट केले.

आर्थिक, सामाजिक विकासाला चालना मिळणार

आयलानी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभाग आणि एमएमआरडीएशी समन्वय साधून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर उल्हासनगर, कल्याण व परिसरातील रहिवाशांना आधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि परिसराच्या आर्थिक, सामाजिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई मेट्रो-५ हा उल्हासनगरच्या विकासाचा कणा ठरणारा प्रकल्प आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असून प्रत्येक टप्प्यावर मी स्वतः लक्ष ठेवत आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतूक सुलभ होईल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि शहराच्या विकासाला नवी गती मिळेल.
कुमार आयलानी, आमदार

Palghar Rain Alert : पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा! डहाणू-तलासरीत पूरस्थिती, रेल्वे सेवा ठप्प

Mumbai : "ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करेन"; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी, VIDEO व्हायरल

Thane : पालिकेत स्मार्ट चष्म्यांना बंदी; स्मार्ट चष्म्याने चित्रित 'रिल्स'नंतर महापालिकेची कारवाई

Mumbai : लोकल ट्रेन आता दर दोन मिनिटांनी! अपघात रोखण्यासाठी 'कवच ५.०' तंत्रज्ञान सज्ज

Mumbai : समुद्र किनारी स्वच्छता मोहीम; १० दिवसांत अडीच हजार टन कचऱ्याची विल्हेवाट