ठाणे

राज्यात लिपिकपदाची भरती ‘एमपीएससी’द्वारे घेण्याचा विचार - आमदार निरंजन डावखरे

लिपिक पदाच्या परीक्षा `एमपीएससी'द्वारे घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पत्रात म्हटले आहे.

प्रतिनिधी

राज्यात भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब (अराजपत्रित), गट - क आणि गट ड संवर्गातील लिपिक वर्गीय सरळसेवा पदभरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या विचाराधीन आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांना राज्य सरकारद्वारे पत्राद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागातील लिपिक वर्गाच्या भरती परीक्षा `एमपीएससी'द्वारे घेण्याची विनंती आमदार निरंजन डावखरे यांनी ४ ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्याकडे केली होती. त्यावर गद्रे यांनी लिपिक पदाच्या परीक्षा `एमपीएससी'द्वारे घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर सरळसेवा पदभरतीच्या प्रचलित कार्यपद्धती ४ मे २०२२ रोजी निश्चित झाली आहे. त्यानुसार आगामी भरती केली जाणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

लिपिक संवर्गातील पदांसाठी स्वतंत्रपणे परीक्षा

राज्यातील सर्व विभागातील लिपिक संवर्गातील पदांसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते. त्यामुळे सर्व विभागांच्या लिपिक संवर्गाची परीक्षा `एमपीएससी'मार्फत घ्यावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली होती. या संदर्भात ऑक्टोबर २०२० मध्ये निर्णय झाल्यावरही अंमलबजावणीला दिरंगाई होत असल्याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले होते.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली