प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

मिरा-भाईंदर : १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

मीरारोड पूर्वेतील सफा टॉवर इमारतीच्या सुरक्षा कॅबिनमध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Swapnil S

भाईंंदर : मीरारोड पूर्वेतील सफा टॉवर इमारतीच्या सुरक्षा कॅबिनमध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

१४ ऑगस्ट रोजी सुरक्षारक्षक असलम अब्दुल जलाल शेख यांची मुलगी फातिमा असलम शेख (१६) हिने वॉचमन केबिनमध्येच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ती बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ जवळच्याच एव्हरशाईन रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी तिला भाईंदर पश्चिमेतील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

यानंतर तिला तातडीने चारचाकी वाहनाने शासकीय रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून मुलगी दाखल होण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद १५ ऑगस्ट रोजी रात्री नयानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

एअर ॲम्ब्युलन्स, नव्या सेवांसाठी कार्यपद्धती; सात सदस्यीय समिती गठित, दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

'मला लंडनला जाण्यापासून रोखलं'; ऑक्सफर्डच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या CJP चे सौरव दास यांचा आरोप, Video

Mumbai : एफडीतील ३० हजार कोटी रुपये गेले कुठे? मोठ्या प्रकल्पासाठी ठेवी मोडल्या - अश्रफ आझमी

नवरा वारंवार माहेरी पाठवायचा, संशय आल्याने बायकोने घरात लावले CCTV; फुटेज पाहून पायाखालची जमीनच सरकली

ठाणे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट; नाचणी, वरईने मान टाकली; पिकांना ९० ते ९५ टक्के फटका