१२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा उलगडा प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

Murbad : १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा उलगडा

मुरबाड शहरात 'दृश्यम' चित्रपटाची आठवण करून देणारा थरारक प्रकार उघडकीस आला असून, तब्बल १२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण आणि खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याच्यासह चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत उर्फ छोटू या तिघांना अटक करण्यात आली आहे.

Swapnil S

मुरबाड : मुरबाड शहरात 'दृश्यम' चित्रपटाची आठवण करून देणारा थरारक प्रकार उघडकीस आला असून, तब्बल १२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण आणि खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याच्यासह चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत उर्फ छोटू या तिघांना अटक करण्यात आली आहे.

घटनास्थळी असलेल्या शासकीय रुग्णालयाजवळील शवविच्छेदन गृहाच्या भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचे समोर आले. फॉरेन्सिक पथक आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हे काम सुरू होते. उत्खननादरम्यान सांगाडा सापडल्याची चर्चा पसरताच परिसरात खळबळ उडाली आणि 'दृश्यम' चित्रपटासारखा काही प्रकार तर नाही ना, अशी चर्चा रंगली. तपासात उघड झाले की, दावडी येथील करण बागुल या तरुणाचे ४ ऑक्टोबर २०१४ रोजी सात एकर जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या पैशांच्या वादातून अपहरण करण्यात आले होते.

त्यानंतर आरोपींनी त्याला दावडीतील कार्यालयात नेऊन लोखंडी रॉडने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करत निघृण हत्या केली. हत्यानंतर मृतदेह कारमधून मुरबाड येथील बारवी धरणाजवळील जंगल परिसरात नेऊन पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने विल्हेवाट लावण्यात आली होती. त्या काळात मुरबाड पोलिसांना सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची नोंद आणि नव्या तपासातील धागेदोरे यांची सांगड घालत गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला.

गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक-०३च्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणात अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद