संग्रहित छायाचित्र
ठाणे

मुरबाडमध्ये गावांचा संपर्क तुटला; अतिवृष्टीमुळे काळू, शाई नदीसह डोईफोडीलाही आला महापूर, आपत्तीव्यवस्थापनाचा रेड अलर्ट

मुरबाड तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसाने तालुक्यातील काळू, शाई, कणकविरा, मुरबाडी नदीसह डोईफोडीलाही महापूर आला असून अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद होऊन गावांचा संपर्क तुटला आहे.

Swapnil S

मुरबाड : मुरबाड तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसाने तालुक्यातील काळू, शाई, कणकविरा, मुरबाडी नदीसह डोईफोडीलाही महापूर आला असून अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद होऊन गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाच्या वतीने रेड अलर्ट जारी करत धोक्याच्या सूचना देऊन नदी, नाले, गडकिल्ले, तलाव, धरणांना पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

दोन जूलैपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून करचोंडे, घोरले, चिखले, चासोळे येथील पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचा संपर्क तालुक्यापासून तुटला आहे. सोबत काळू नदीची पातळी वाढली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सतर्क करण्यात आले असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस अतिवृष्टी होणार असून ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तहसीलदारांनी केली पाहणी

मुरबाड तालुक्यातील अनेक पूल पाण्यात गेले आहेत. त्याची पाहणी मुरबाडचे तसीलदार अभिजीत देशमुख यांनी करून पूरस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी नदीपात्रालगतच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या वाड्या-पाड्यांना भेट दिली तसेच नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'वर्ककेशन'मध्ये मुंबईचा ग्लोबल डंका; 'वर्क फ्रॉम एनिवेअर'मुळे उत्पादकतेत ८० टक्के वाढ; कामासोबत पर्यटनासाठी मुंबईला जागतिक पसंती

Pune : दोन महिला पोलिस करणार होत्या समलैंगिक विवाह; आळंदीत लग्नाची तयारी, पत्रिकाही छापल्या, पण आता विवाह रद्द

माहुलमध्ये तीन मजली अत्याधुनिक अग्निशमन केंद्र; आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळणार; अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था

केशव सृष्टी सहल वादाच्या भोवऱ्यात! सपानंतर काँग्रेसचाही विरोध

तुर्भेमधील गोदामातील जप्ती हायकोर्टाने ठरवली बेकायदेशीर; नवी मुंबई पोलिसांना झटका