मेहता विरुद्ध सरनाईक संघर्षातील पुढचे प्रकरण; घोडबंदरची जमीन बळकावल्याची पोलिसांत तक्रार 
ठाणे

मेहता विरुद्ध सरनाईक संघर्षातील पुढचे प्रकरण; घोडबंदरची जमीन बळकावल्याची पोलिसांत तक्रार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना गोत्यात आणण्यासाठी भाजपचे मिरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी आणखी एक प्रकरण बाहेर काढले आहे.

Swapnil S

ठाणे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना गोत्यात आणण्यासाठी भाजपचे मिरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी आणखी एक प्रकरण बाहेर काढले आहे. घोडबंदर रोडवरची मोक्याची जागा आदिवासींना धमकावून बळकावण्यात आल्याचा आरोप मेहता यांनी केला असून या संदर्भात प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मेहता यांनी याबाबत थेट पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे हे प्रकरण चांगलेच पेटण्याची व महायुतीतील विसंवाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

मेहता यांनी या प्रकरणाबाबत रविवारी एक फेसबुक पोस्ट केली होती. भाईंदरपाडा येथील गंगाधर भाऊ भोईर, सुमती गोविंद तंगडी, शांताबाई मोतीराम भोईर, रामचंद्र मोतीराम भोईर, मनोहर मोतीराम भोईर, दिपा अजय म्हात्रे, हितेश रमेश भोईर, मोहिनी रमेश भोईर या भूमिपुत्र बांधवांच्या २४३९ चौ. मीटर पैकी १२१९ चौ. मीटर जमीन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व त्यांच्या गुंडांकडून बळकावण्यात आल्याची बाब समोर आली आहे असा थेट आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला होता. हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून, आपल्या हक्कांचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. याविरुध्द कासारवडवली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार सोमवारी भाजपच्या कार्यालयातून मोठ्या ताफा पोलिस ठाण्यात गेला व उपायुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे या प्रकरणाची कागदपत्रे सोपवण्यात आली.

Nagpur : जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती; ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, VIDEO

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण