ठाणे

ठाण्यात ज्ञानेशकुमार यांची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे आंदोलन

एसआयआरसह मतदार नोंदणीसाठीच्या फॉर्ममधील तरतुदी बदलण्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने (शप) केला.

Swapnil S

ठाणे : एसआयआरसह मतदार नोंदणीसाठीच्या फॉर्ममधील तरतुदी बदलण्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने (शप) केला. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड काढली.

ज्ञानेशकुमार यांची वेशभूषा केलेल्या इसमाला गाढवावर बसवून धिंड काढण्यात आली. फॉर्म सहामध्ये बदल करून सीईसी ज्ञानेशकुमार यांनी संविधान पायदळी तुडवल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पाणी टंचाईने ठाणेकर हैराण; जलशुद्धीकरण केंद्रातील काम लांबल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

ठाण्यातील आरोग्य केंद्रांवर करडी नजर

४-जी स्मार्टफोनची बाजारपेठ वाढणार; ५-जी महागल्याने बजेट श्रेणीत ४जी मोबाईल्सना मागणी

दुष्काळ पाहणीसाठी महाराष्ट्रात पथक पाठवणार; केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा