ठाणे

भिवंडीत शेजार धर्माला काळिमा; नराधमाचा शेजारील बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न

याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Swapnil S

भिवंडी : शेजार धर्माला काळिमा फासणारी धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कोनगाव परिसरातील एका सोसायटीच्या टेरिसवर घडली आहे. ३२ वर्षीय आरोपीने शेजारील ३ वर्षीय अल्पवयीन मुलीला इमारतीच्या टेरिसवर घेऊन जात तिला मारहाण करून अर्धनग्न करीत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पिडीत बालिकेचे आई - वडील कामावर असताना ३२ वर्षीय आरोपी शेजाऱ्याने बालिकेच्या बालमनाचा फायदा घेत तिचा जबरीने हात पकडून त्याच इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेला. त्यानंतर पीडितेला मारहाण करून तिचे कपडे काढून तिला अर्धनग्न करीत अतिप्रसंगाच्या तयारीत होता; मात्र त्यावेळी इमारतीत राहणारा अन्य एका तरुणाने त्यास गैरकृत्याच्या प्रयत्नात असताना पाहिले. त्यावेळी नराधमाने टेरेसवरून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न करत पहिल्या मजल्यावरून खिडकीतून उडी घेतली. त्यामुळे त्याचा उजवा हात मुरगळला. घटनेनंतर जमावाने त्याचा पाठलाग करून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून नराधमाच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात पोक्सोन्वये गुन्हा दाखल करून त्यास बेड्या ठोकल्या आहेत.

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाकरे-शिंदे शिवसेनेचे आज दसरा मेळावे

आता लक्ष कसोटी मालिकेकडे; गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आजपासून वेस्ट इंडिजशी पहिला सामना

डाळ उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकारची योजना; ११,४४० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर, ६ पिकांचा MSP वाढवला