ठाणे

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी गुड न्यूज! माथेरानची मिनी ट्रेन 'या' तारखेपासून पुन्हा सुरू

Matheran Train : पावसाळा संपला की नेरळ-माथेरान-नेरळ या मार्गावरील मिनी ट्रेन सेवा १ ऑक्टोबर रोजी नियमित सुरू होत होती. मात्र यंदा नोव्हेंबर उजाडला तरी ही सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे ही ट्रेन सेवा सुरू होण्यासाठी आणखी किती दिवस लागणार असा सवाल उपस्थित केला जात होता.

Swapnil S

माथेरान : पावसाळा संपला की नेरळ-माथेरान-नेरळ या मार्गावरील मिनी ट्रेन सेवा १ ऑक्टोबर रोजी नियमित सुरू होत होती. मात्र यंदा नोव्हेंबर उजाडला तरी ही सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे ही ट्रेन सेवा सुरू होण्यासाठी आणखी किती दिवस लागणार असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाने सोमवारी जाहीर केलेल्या पत्रकानुसार ६ नोव्हेंबरपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू होत आहे.

नेरळ-माथेरान-नेरळ या मार्गावर ट्रेन सेवा सुरू करण्यासाठी इंजीन उपलब्ध होते. परंतु प्रवासी वर्गाचे डबे, कोचेस उपलब्ध नव्हते. देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी प्रवासी वर्गाचे डबे दर दोन वर्षांनी कुर्डुवाडी येथे पाठविण्यात येतात. यंदा त्याला उशीर झाल्यामुळे हे डबे परत नेरळ येथे आणण्यास किती विलंब लागेल हे सांगणे कठीण होते. त्यामुळे नेरळ-माथेरान-नेरळ या मार्गावरील ट्रेन सेवा सुरू कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार ६ नोव्हेंबरपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू होत आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

चीनकडून नव्या डावपेचांची आखणी

मुंबई धोक्याच्या पातळीवर

जुलै महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य