ठाणे

ठाण्यात प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची नवी इमारत; आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश !

Swapnil S

ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजित बांगर यांच्या प्रयत्नातून भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण देणारी देशातील पहिली चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची नवीन इमारत व वसतिगृह बांधण्याचा शिवसेनेचा संकल्प सोहळा दि. ८ फेब्रुवारी, रोजी दुपारी १२.३० वा. वसंतविहार येथील ठाणे महापालिका शाळा क्रं. १३३ येथील आरक्षित भुखंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील वर्तकनगर भागात नानासाहेब धर्माधिकारी प्रशासकीय इमारतीमध्ये पालिकेची सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या माध्यामतून यूपीएससी आणि एमपीएससीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या संस्थेत ठाणे शहरासह राज्याच्या इतर भागातील विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात. त्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्याने त्यांची गैरसोय होत होती; तशा तक्रारी आ. सरनाईक यांच्याकडे येत होत्या. त्यामुळे या संस्थेची स्वतंत्र इमारत असावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सरनाईक यांच्या मतदारसंघात असलेल्या वसंत विहार भागातील महापालिकेच्या शाळा क्रं. १३३ च्या आरक्षित भूखंडावर ही इमारत उभरावी असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे देण्यात आला होता. त्याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे त्यासाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ही संस्था ठाण्याचे वैभव असल्याने महापालिका याचा खर्च करेल, असे आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. परंतु पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने, हा खर्च राज्य शासनाने करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घातले जाईल, असेही आमदार सरनाईक यांनी सांगितले.

अशी असणार इमारत

ही इमारत सात ते नऊ मजल्यांची असणार आहे, त्यामध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थींनी आणि १०० विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह देखील असणार आहे. याशिवाय या ठिकाणी वातानुकुलीत वर्ग, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, तसेच अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने खेळाचे मैदान इनडोर गेम्सआणि व्यायाम शाळा उभारली जाणार आहे. तसेच वाचनालय, प्रशस्त हॉल व इतर सोई सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. अशा प्रकारे प्रशासकीय प्रशिक्षण देणारी ही भारतातील पहिली संस्था ठाण्याचा मानबिंदू ठरेल. यामुळे तलावांचे शहर असलेले ठाणे यानंतर प्रशासकीय प्रशिक्षणाची जननी म्हणूनही ओळखले जाईल, असे ओवळा आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त