ठाणे

उल्हासनगर शहराच्या प्रगतीचा नवा ‘रोडमॅप’ तयार; रस्ते, पाणी, नियमितीकरण आणि ऑनलाइन तक्रार प्रणालीवर मोठा निर्णय

उल्हासनगर शहराच्या विकासासाठी निर्णायक टप्प्यावर असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आमदार कुमार आयलानी आणि महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यात विशेष बैठक पार पडली.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर शहराच्या विकासासाठी निर्णायक टप्प्यावर असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आमदार कुमार आयलानी आणि महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील रस्त्यांचे काम, पाणीपुरवठा, नियमितीकरण प्रक्रिया, कचरा व्यवस्थापन, आणि उल्हासनगर महापालिकेच्या काही जागांचे व्यावसायिक रूपांतर यांसह विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. या बैठकीचे परिणाम एका महिन्यात दिसून येणार असून, मार्चपर्यंत शहराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

आमदार कुमार आयलानी यांनी नागरिकांच्या तक्रारींवर लक्ष केंद्रित करून शहरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला. त्यांनी विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आयुक्तांसमोर स्पष्ट मागण्या मांडल्या. रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत असून, मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. शहरातील विविध भागांत सुरू असलेली रस्त्यांची कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील. बेजबाबदार ठेकेदारांचे टेंडर रद्द करून कार्यक्षम ठेकेदारांना संधी दिली जाईल. १७ सेक्शन परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी ऑनलाइन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू करण्यात येत असून, ई-ऑफिस प्रणालीद्वारे त्यावर कार्यवाही केली जाईल. चांगल्या कामगिरीसाठी कर्मचाऱ्यांना बढती देण्याचा निर्णय घेतला जाईल. नव्या मनपा इमारतीचा वापर करण्यासाठी स्थानिक आर्किटेक्ट्सचा समावेश केला जाईल. या मुख्य मुद्यावार चर्चा करण्यात आली.

हे निर्णय उल्हासनगरच्या भविष्याचे टर्निंग पॉईंट

मनपातील रिक्त पदे भरून विकासकामांना गती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. या योजनांमुळे शहरातील नागरी सुविधा सुधारतील आणि प्रशासन अधिक सक्षम होईल. या बैठकीनंतर आता उल्हासनगरच्या नागरिकांना पुढील काही महिन्यांत विकासाच्या दृष्टीने सकारात्मक बदल अनुभवायला मिळणार आहेत. शहराच्या विकासासाठी घेतलेले हे निर्णय उल्हासनगरच्या भविष्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार असल्याचे आमदार कुमार आयलानी यांनी म्हटले आहे.

मनपाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आणि शहराच्या विकासाला वेग देण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील. ई-ऑफिस प्रणालीमुळे नागरिक तक्रारींचे स्टेटस ट्रॅक करू शकतील. पाणीपुरवठा, ड्रेनेज, आणि नियमितीकरणासंबंधी विशेष पथक स्थापन करून मार्च अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचे आणि एमएमआरडीएच्या सात रस्त्यांचे काम वेगाने सुरू करण्यात येणार आहे. बेजबाबदार पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, तर चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती देण्यात येईल.

- मनीषा आव्हाळे, महापालिका आयुक्त

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती