ठाणे

सार्वजनिक शौचालयात सापडले नवजात बाळ; बाळाला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात केले दाखल

बाळ रुग्णालयात आणले तेव्हा बाळाची नाळ बांधलेली नव्हती, तसेच त्याचे शरीर पूर्णतः थंड पडले होते

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चक्क महिला सार्वजनिक शौचालयातील शौच करण्याच्या भांड्यात एक दिवसाचं नवजात बाळ सापडलं आहे. बाळाला परिसरातील नागरिकांनी शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर ४ सुभाष टेकडी परिसरातील आम्रपालीनगर येथील सार्वजनिक शौचालयात सकाळच्या सुमारास एक महिला शौच करण्यासाठी गेली होती. तेव्हा तिला शौच करण्याच्या भांड्यात एक बाळ असल्याचे दिसले. तेव्हा ती घाबरून शौचालयाच्या बाहेर आली आणि परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी बाळाला शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांनी तात्काळ नवजात बाळावर उपचार सुरू केले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले बाळ हे स्त्रीजातीचे असून, त्याचे वजन २ किलो १३० ग्रॅम आहे. बाळ रुग्णालयात आणले तेव्हा बाळाची नाळ बांधलेली नव्हती, तसेच त्याचे शरीर पूर्णतः थंड पडले होते. मात्र तात्काळ उपचार सुरू केल्याने आता बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉ. वसंतराव मोरे यांनी दिली.

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

माझ्या आईचा अपमान बिहारची जनता विसरणार नाही; पंतप्रधान मोदींची राजद, काँग्रेसवर टीका

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

ठाकरेंचे श्रेय महायुतीने लाटले

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य