ठाणे

अंबरनाथमध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Swapnil S

उल्हासनगर : बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना अद्याप ताजी असतानाच अंबरनाथमध्येही एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत ९ वर्षांच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून, आरोपी संतोष कांबळे (३५) याला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित मुलगी अंबरनाथ शहरातील एका सार्वजनिक शौचालयात गेली असताना, आरोपी संतोष कांबळे याने तिला एका कोपऱ्यात नेऊन तिला अश्लील चित्रफित दाखवली. त्यानंतर, या नराधमाने तिचा विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारामुळे मुलगी प्रचंड घाबरली आणि घरी परतल्यानंतर घडलेली घटना तिच्या आईला सांगितली.

अल्पवयीन मुलीच्या आईने तातडीने अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला आणि संतोष कांबळे याला अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत संबंधित आरोपीवर पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात ठोस पुरावे गोळा केले असून, या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. यासोबतच पीडित मुलीच्या कुटुंबाला आवश्यक ती मानसिक आणि कायदेशीर मदत देण्यात येत आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर अंबरनाथ शहरात संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सामाजिक संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी कठोर पावले उचलून दोषीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर अंबरनाथ आणि आजूबाजूच्या परिसरात मुलींच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. पोलिसांनीही शहरात गस्त वाढवण्याची योजना आखली आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत