ठाणे

Ulhasnagar : विवाहितेचे अश्लील फोटो व्हायरल केले; पतीच्या WhatsApp वरही पाठवले, गुन्हा दाखल, आरोपी फरार

एका विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवून व्हिड[ओ कॉलद्वारे तिचे अश्लील फोटो घेऊन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या इसमाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

उल्हासनगर : एका विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवून व्हिड[ओ कॉलद्वारे तिचे अश्लील फोटो घेऊन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या इसमाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नंबर ४ या परिसरात एक ३० वर्षीय महिला तिच्या पतीसोबत राहते, तीन वर्षांपूर्वी तिची ओळख उल्हासनगर कॅम्प ३ येथील राहुल नगर या ठिकाणी राहणाऱ्या लाल मोहन अयुब शेख (३५) याच्याशी झाली होती.

दरम्यान शेखने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. काही दिवसांपूर्वी शेखने पीडित महिलेला व्हिडीओ कॉल करून नग्न होण्यास सांगितले, मात्र त्याचा गैरफायदा घेत शेखने हा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला आणि त्याचे स्क्रीनशॉट फेसबुकच्या अकाऊंटवरून व्हायरल केले.

एवढेच नव्हे तर १५ जुलै रोजी शेखने महिलेचे अश्लील फोटो तिच्या नवऱ्याच्या मोबाईल फोनवर व्हॉट्सअॅपवरही पाठवले. याप्रकरणी महिलेने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी लाल मोहन आयुब शेख याच्याविरुद्ध तक्रार केली असता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक टी. एस. खळदे हे करीत आहेत.

NATO ची भारत, चीन, ब्राझीलला धमकी; रशियाशी व्यापार थांबवा, अन्यथा १०० टक्के टॅरिफ

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; २४ हजार कोटी रुपये खर्च होणार

फडणवीस-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगली जुगलबंदी; आमच्यासोबत सत्तेत या! मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना सभागृहातच थेट ऑफर

राज ठाकरे यांचे ‘तळ्यात-मळ्यात’; युतीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही!

चाचपडते विरोधक, धडपडते सरकार