ठाणे

डोंबिवलीत युवा सेनेतर्फे बाइक रॅलीचे आयोजन

श्रीरामचंद्र मूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्याने देशभरात उत्सव साजरा होत आहे

Swapnil S

डोंबिवली : अयोध्येत २२ तारखेला प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. देशभर हा सोहळा साजरा होत असून युवा सेनेच्या वतीने सचिव दीपेश म्हात्रे यासह अनेक युवसैनिकांनी बाइक रॅलीचे आयोजन केले होते. डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव ठाकुर्ली येथून रॅलीची सुरुवात होऊन पुढे सम्राट चौक, गुप्ते रोड, ठाकुर्ली उड्डाणपूल, बाजीप्रभू चौक येथून शिवसेना मध्यवर्ती शाखेपर्यत रॅलीची समाप्त झाली. यावेळी युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले, श्रीरामचंद्र मूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्याने देशभरात उत्सव साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथे दीपोत्सव साजरा होत आहे.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली